- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Case filed against Congress state president Nana Patole in Akola
अकोला: शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने भारत बंद ला पाठींबा देत सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान सोमवारी दुपारी अकोला येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली विना परवानगी काढण्यात आल्याने नाना पटोले यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
परवानगी न घेता रॅली काढणे व कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पटोले व कार्यकर्ते यांच्यावर लावण्यात आला आहे. याप्रकरणी नाना पटोले यांच्यासह जवळपास 120 कार्यकर्त्यां विरुध्द सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. स्वराज्य भवन येथून रॅलीला सुरवात झाली. ही रैली रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शहरातील विविध प्रमुख व आंतर मार्गाने मार्गक्रमण करत निघाली होती.
या रॅली दरम्यान विविध नियमांचे उल्लंघन केल्या गेले. साथरोगाचा फैलाव होईल, अशा प्रकारे रैलीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे वर्तन होते. कोविड नियमांचा फज्जा उडविला गेला. यामुळे या रॅलीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १०० ते १२० जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची महिती प्राप्त झाली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा