Meeting: Krantijyoti Brigade: अकोट येथे क्रांतिज्योती ब्रिगेडचा मेळावा; सामाजिक बांधिलकी कायम ठेवा - ॲड अंबाडकर

Meeting of Krantijyoti Brigade at Akot; Maintain social commitment - Adv Ambadkar



अकोट - क्रांतीज्योती ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने अकोट येथे आज  19 सप्टेंबर रोजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. दर्यापूर रोड वरील रामेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या या मेळाव्याला क्रांतीज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नंदेश अंबाडकर, क्रांतीज्योतीचे अकोला जिल्हाध्यक्ष ॲड. नरेंद्र बेलसरे यांची उपस्थिती होती.




ओबीसींचा लढा व समाज जोडो अभियान या उपक्रमाद्वारे  क्रांतीज्योती ब्रिगेडच्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक बांधणी करण्यासाठी  समाजातील तरुणांनी पुढे येऊन जनजागृती करावी आणि प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन नंदेश अंबाडकर यांनी यावेळी केले. 




कोटात कार्यकर्त्यांची मजबूत फौज आहे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, अशी आशा ॲड नरेंद्र बेलसरे यांनी व्यक्त केली. शहर आणि ग्रामीण स्तरावर क्रांतीज्योती ब्रिगेडच्या शाखा स्थापन करून संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येईल, असे देखील ॲड नरेंद्र बेलसरे यांनी यावेळी सांगितले.





मेळाव्यात सुनील अंबळकार, डॉ.राजेंद्र नाथे, निलेश काळे, विनोद रसे, विजय हाडोळे, संजय निमकर्डे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी असा या मेळाव्याचा सुर होता. 



या कार्यक्रमाला क्रांतीज्योती ब्रिगेडचे नंदकिशोर गोरडे, स्वप्नील इंगळे, अनिल इंगळे,अनिल फुलारी,अशोक अंबाडकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 




टिप्पण्या