Katepurna river: काटेपुर्णा नदीत बैल धुताना वाहुन गेलेल्या दोन युवकांपैकी एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध जारी

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला :कानशिवणी येथे पोळा सणा निम्मित बैल धुत असताना काटेपुर्णा नदीत वाहुन गेलेल्या दोन युवकांपैकी गोपाल कांबेचा जांभ गाव जवळ आज मृतदेह  सापडला आहे. तर सागर कावरेचा शोध सुरु आहे. 




या सर्च ऑपरेशन मध्ये मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर चे जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात अंकुश सदाफळे, ज्ञानेश्वर म्हसाये, शरद महल्ले, निलेश खंडारे, दीपक गांजरे, विकी साटोटे, राहुल जवके, विकी पिंजरकर, सुरज ठाकुर, ओम साबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम सुनिल कल्ले, हरीहर निमकंडे, चंडीका आपत्कालीन पथक काटेपुर्णा आणि गावकरी सहभागी आहेत,अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.




कानशिवणी (अकोला) येथील सागर गोपाल कावरे (वय अं. 20) गोपाल महादेव कांबे (वय अं.20) हे दोन युवक पार्डी येथील काटेपुर्णा व पिंजर्डा नदीच्या संगमावर बैल धुत असताना काटेपुर्णा नदीत वाहून गेले, अशी माहिती काल बार्शिटाकळी तहसीलदार गजानन हामंद यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले होते. 



यावेळी जिवरक्षक दीपक सदाफळे हे मुक्ताई नगर येथे सर्च ऑपरेशन राबवित होते. तरीपण लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी धिरज राऊत, अंकुश सदाफळे, कुलदीप जयस्वाल, सचिन बंड, अभिषेक जाधव, गणेश राऊत, अभिषेक सुरजुसे, ऋतीक इंगळे, नितीन ठक यांना शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी पाठविले. सर्च ऑपरेशन चालु केले. यावेळी नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात अडचण येत होती. उद्या सकाळी पुन्हा सकाळी सर्च ऑपरेशन चालु केले जाईल अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे होती. पार्डी येथील आणी कानशिवणी येथील नागरिकांनी शोधण्यासाठी मोठे सहकार्य केले. यावेळी तहसीलदार हामंद , तहसीलदार अरखराव ,पिंजर ठाणेदार महादेव पडघान  आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, तलाठी सुनील कल्ले,सरपंच पार्डी, सरपंच कानशिवणी हे यावेळी उपस्थित होते.


आगर येथेही एक युवक वाहून गेला


बैल धुण्यासाठी गेलेल्या आगर येथील एका युवकाचा गाव तलावात बुडुन मृत्यू तर कानशिवणी येथील दोन युवक पार्डी येथील काटेपुर्णा व पिंजर्डा नदीच्या संगमावर बैल धुत असतांना काटेपुर्णा नदीत वाहून गेले होते. यामध्ये आगर येथील युवकाचा मृतदेह  गावातील नागरिकांनी बाहेर काढला.काटेपुर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकांचा गावकरी नदीने शोध घेणे सुरू केले होते. मात्र युवकांचा शोध लागला नव्हता.


टिप्पण्या