Heavy to very heavy rainfall: अकोला: सर्तकतेचा इशारा: 25 सप्टेंबर पर्यंत हलका ते मध्यम पर्जन्यमान;काटेपूर्णा प्रकल्प 100 टक्के, दोन वक्रद्वारे उघडली, नदीपात्रात विसर्ग




   katepurna project



ठळक मुद्दा


काटेपूर्णा  प्रकल्पाचे  एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण  ५१.१६ घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.




अकोला: आठवड्याभरा पासून राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे या चार -पाच दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, विदर्भातही मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शनिवार  25 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत  अकोला जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान व एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.


नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु  असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच  संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश मंगळवारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.




दरम्यान हवामान खात्याने (IMD) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केवळ आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे.  भारतीय हवामान खात्याने मंगळवारी कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला.


  




विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळणार आहेत. संबंधित जिल्ह्यांत राहाणाऱ्या नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 




   Purna Medium Project


Dt.21/09/2021: 5.00 pm         

Level - 451.15 Mtr 

Storage - 31.48 Mm3 

Percentage  - 89 % Now 9 gate are open 15 cm each. Discharge 117.04 cumecs.



 काटेपूर्णा प्रकल्प

आज दि. २१/०९/२०२१ रोजी   सायंकाळी ७.०० वाजता काटेपूर्णा  प्रकल्पाचे  एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण  ५१.१६ घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे.      


  काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष                  


𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭                                                   

 21/09/2021  7.00 pm       

 𝐋𝐞𝐯𝐞𝐥 - 347.77 𝐦𝐭𝐫 

 𝐒𝐭𝐨𝐫𝐚𝐠𝐞 - 86.35 𝐦𝐦3

 𝐏𝐞𝐫𝐜𝐞𝐧𝐭𝐚𝐠𝐞  - 100%



               विसर्ग अलर्ट

खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही

दि. 21-09-2021

वेळ: 8.30 pm Hrs.

जलाशय पाणीपातळी= 520.16मी.

जीवंत पाणी साठा =83.52

जीवंत साठा टक्केवारी= 89.42%


दि. 21-09-2021 रोजी  8.30 pm वाजता  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 13 द्वार 0.30 मीटरने उघडण्यात आले आहे.

 सद्यस्थितीत प्रकल्पाचे 13 द्वार  0.30 मीटरने चालू असून एकूण= 14190 cusec क्यूसेक्स(401.5cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


*नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे*


*खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*


टिप्पण्या