Heavy rain: विसर्ग अलर्ट :सतर्कतेचा इशारा: अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली: घुंगशी ब्यारेजचे सर्व दरवाजे उघडले ; काटेपूर्णा, खडक पूर्णा, पेन टाकळी प्रकल्पातून विसर्ग सुरू

Alert: Water level of Morna River flowing through the city rises: All gates of Ghungshi Barrage opened;  Visarga started from Katepurna, Khadak Purna, Pen Takli project






अकोला: दोन दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसाने जोर पकडला आहे. शहरामधून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे पात्र  दुथडी भरून वाहत आहे. महान धरणाचे 10 दरवाजे उघडल्यामुळे या नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे .मोर्णा नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे. जीवितहानी होवू नये, यासाठी नदीच्या काठावर कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.




  घुंगशी ब्यारेजचे सर्व दरवाजे उघडले 


आज दि 29/09/21 रोजी सकाळी 6.00 वाजता.

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे ब्यारेजची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात 10 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 256.50 मी असुन पूर  विसर्ग 1800 घमीप्रसें आहे.



              काटेपूर्णा प्रकल्प  

आज दि. २९/९/२०२१ रोजी सकाळी ७.०० वाजता काटेपूर्णा  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग १०२.३३ घ.मी./से.  वरून कमी करून ५१.१६ घ.मी./से.  एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी 30 cm उंचीने उघडुन  नदीपात्रात   विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

    काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


Purna Barrage-2(Ner Dhamna)

Dt. 29/09/2021 @ 7.00 A.M

Level -241.50

Gate- 12 Open(All)

Discharge- 7 gate only )1505.घमीप्रसे.



           Morna river

मंगळवारी सायंकाळी मोर्णा नदी 

नदी पातळी 270.40 M.,

उंची 1.80 M., विसर्ग 327.03 Cumecs .


             काटेपूर्णा प्रकल्प   


२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता काटेपूर्णा प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग ३५२.८२ घ.मी./से.  वरून कमी  २५५.८२९ घ.मी./से.  एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण   १० वक्रद्वारे प्रत्येकी 30 cm उंचीने उघडुन  नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

        

  काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष* 




            *विसर्ग अलर्ट*

खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*दि. 28-09-2021

वेळ: 6.00 pm Hrs.

जलाशय पाणीपातळी= 520.70मी.

जीवंत पाणी साठा =93.404

जीवंत साठा टक्केवारी= 100%





28-09-2021 रोजी  6.00 pm वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 19 द्वार 1.50 मीटर  मीटरने  उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 19 द्वार 1.50 मीटरने चालू असून एकूण= 107769 cusec क्यूसेक्स 3049 cumec 

विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष


    



          पेनटाकळी प्रकल्प

        ता.मेहकर जि.बुलडाणा



28/09/2021 रोजी रात्री 8.15 वाजता पुरनियंत्रणाकरिता पेनटाकळी प्रकल्पाची सर्व वक्रद्वारे 5 सेमी ने वाढवून 30 सेमी करण्यात येणार आहेत व एकूण 9 वक्रद्वारांद्वारे पैनगंगा नदीमध्ये 281.82 cumecs एवढे पाणी सोडण्यात येणार आहे.


धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात आणखी वाढ करण्यात येईल. तरी, पैनगंगा नदीच्या काठावरील गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, हि विनंती.


*पेनटाकळी प्रकल्प पुरनियंत्रण कक्ष, मेहकर*





टिप्पण्या