Ganpati festival 2021: Akola: गणपती आगमनासाठी अकोला सुसज्ज: पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त; तर गणपती स्थापनेसाठी पुरोहितांनी सांगितला मध्यान्ह मुहूर्त उत्तम

Akola equipped for Ganpati's arrival: Police will have tight security; The priests said that the noon moment is the best time for the establishment of Ganapati





 


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: खोलेश्वर भागातील श्री भोलेश्वर मंदिर येथे गणपती मुहूर्त साठी अकोला पौरोहित्य संघाची सभा घेण्यात आली. ज्योतिष शास्त्राप्रमाणे दिवसाचे चार विभाग असतात. शास्त्रानुसार दुपारी गणपती जन्म झाला. श्री गणेश पुराण व अन्य शास्त्रानुसार माघ कृष्ण चतुर्थी, भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी, श्री गणेश जयंती समजल्या जाते. भद्रेत गणपती जन्म झाला असल्याचे प्रमाण प्राप्त होते. यावर्षी 10 सप्टेंबर शुक्रवार रोजी गणेश चतुर्थी येत आहे. यासाठी सभेमध्ये गणपती स्थापनेचे उत्तम मुहूर्त सांगण्यात आले.



असे सांगितले मुहूर्त 

          सभेत उपस्थित पुरोहित


मध्यान्ह मुहूर्त: 09:18 पासून10:51 पर्यंत

चल सकाळी :06:18 पासून07:46 पर्यंत

लाभ : सकाळी 07:46 पासून 09:18 पर्यंत.


शुभ अपरान्ह :12:24 पासून 01:56 पर्यंत

चंचल: सायं 05:02 पासून 06:34 पर्यंत


अभीजित मुहूर्त: मध्यान्ह 11:59 पासून 12:47 पर्यंत श्री स्थापनेसाठी उत्तम मुहूर्त राहील.



सभेत पंडित भैरव शर्मा, हेमंत शर्मा, शिव शर्मा कल्याणवाले, प्रमोद तिवारी, श्यामसुंदर अवस्थी, पंडित रवी कुमार शर्मा उपस्थित होते.





जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त

जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर (file photo)


आगामी गणेशउत्सवाचे अनुषंगाने अकोला जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, याकरीता अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


आगामी सुरु होणारे गणेश उत्सव दरम्यान अकोला जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारी तत्वांविरुध्द  कलम १०७ अन्वये ६४९, १०९ अन्वये ०६, ११० अन्वये ३१, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५, ५६, ५७ अन्वये ०८, प्रतिबंधात्मक केसेस करण्यात आलेल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता कलम १४४ अन्वये एकुण १५२ व कलम १४९ अन्वये ९६ इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. 



अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारी वृत्तीचे एकुण ३७ ईसमांविरुध्द एमपीडीए अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात येवुन त्यांना जिल्हा कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले. एकुण ६६ गुन्हेगारी टोळयांना अकोला जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे.




आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने  जिल्हाधिकारी अकोला याचे अध्यक्षतेखाली गणेश स्थापना व विसर्जन संबंधाने आढावा बैठक घेण्यात आली असुन पो.स्टे. स्तरावर शांतता कमिटीच्या एकुण ४३ बैठका तसेच पो.स्टे. अंतर्गत असलेले पोलीस मित्र यांच्या ५५ बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांचेकडुन जनतेस "एक गांव एक गणपती" योजना राबविण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.


गणेश उत्सवांचे पार्श्वभुमीवर अकोला जिल्हा घटकामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, याकरीता सर्व पोलीस स्टेशन स्तरावर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, पोलीस नियंत्रण कक्ष अकोला येथे १ क्युआरटी प्लाटुन, ०४ आरसीपी प्लाटुन, ०१ एसआरपीएफ कंपनी व पोलीस मुख्यालय अकोला येथुन राखीव फोर्स ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्हयांतर्गत पो.स्टे. हद्दीत विशेष गस्त पथके तयार करण्यात येवुन हे पथके प्रभावी गस्त करणार आहेत. अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन गणेश उत्सवाचे अनुषंगाने दंगा काबु योजना तसेच रुट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.


१० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सव बंदोबस्ताकरीता अकोला जिल्हा पोलीस दलातील ०१ अपर पोलीस अधिक्षक, ०२ उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, ९५ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, १४०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्डस तसेच पोलीस मुख्यालय अकोला येथुन ०४ आरसीपी प्लाटुन, १ क्युआरटी प्लाटुन, रिझर्व फोर्स तसेच राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी असा बंदोबस्त पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली सुसज्य करण्यात आला आहे.

टिप्पण्या