Corona update: Akola District: आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह;जाणून घ्या उद्याचा लसीकरण कार्यक्रम

                                      file image




अकोला,दि.20: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे आरटीपीसीआर 24 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57850(43246+14427+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 319090 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 315472 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3216 नमुने होते. आजपर्यंत एकूण 319090 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 275844 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शुन्य पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.


दोन डिस्चार्ज


आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील दोन  रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


16 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57850(43246+14427+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56698 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 16 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 112 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 112 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.



काल दिवसभरात अकोला महानगर पालिका येथे 85, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 23, हेगडेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 112 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आले.




           *कोरोना अलर्ट


*आज सोमवार दि. २० सप्टेंबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,* 


*प्राप्त अहवाल-२४*

*पॉझिटीव्ह-शून्य*

*निगेटीव्ह-२४* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- शून्य


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.


आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील दोघांना डिस्चार्ज देण्यात आले.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२४६+१४४२७+१७७=५७८५०*

*मयत-११३६*

*डिस्चार्ज-५६६९८*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१६* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*




उद्या दिनांक 21/09/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

4)आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालयाची वेळ 9 ते 1 पर्यंत राहील

5) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

6) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

7)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

8)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

9) GMC अकोला

10) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम डोस तथा 100 द्वितीय डोस) [ कूपन  50 प्रथम डोस तथा 100 द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covexin (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम डोस तथा 100 द्वितीय डोस) [  कूपन 50 प्रथम तथा 100 द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.

‌----------------------------------------


टिप्पण्या