- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akot: robbers caught by police: कोरोना लसीकरण पथक असल्याचा बनाव करणारे दरोडेखोर 72 तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
The robbers, who pretended to be a corona vaccination squad, were caught by police within 72 hours
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: अकोट येथील वृद्ध व्यापारीच्या घरावर कोरोना लसीकरणचे पथक असल्याचा बनाव करून दरोडेखोरांनी 31 ऑगस्ट रोजी दुपारी सशस्त्र दरोडा टाकला होता. अकोट पोलिसांनी मोठ्या शिताफीने जाळे टाकून 72 तासांच्या आत आज दरोडेखोरांना जेरबंद केलं आहे. यामध्ये 3 पुरुष, 3 महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
अकोट मधील रहिवासी यश्विन सेजपाल आणि त्यांची पत्नी आणि लहान मुलगा त्यांच्या नातेवाईकांच्या येथे खामगावला एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. हीच संधी साधून त्यामुळे त्यांच्या घरी दोन अज्ञात पुरुष आणि स्त्रिया एकाच वेळी आले. कोरोना लसीकरण पथक असल्याचा त्यांनी बनाव केला होता. याश्विन यांचे वडील वृद्ध व्यापारी अमृतलाल, आई इंदूबहन आणि मुलगी डेलिशा घरी होते. कोरोनाची लस घेतली आहे का? असे दरोडेखोरांनी विचारले. परंतु डेलिशा हिला शंका आल्याने तिने प्रतिप्रश्न केल्यावर, दरोडेखोर एक सर्वेक्षण करण्याविषयी बोलले आणि जबरदस्तीने घरात प्रवेश मिळविला. तिघांचेही हात -पाय बांधले आणि 729700 किंमतीचा मुद्देमाल,मोबाइल आदी घेऊन पळून गेले होते.
यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरविले. अकोट पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नामदेवराव टवरे 50 वर्षे, वैशाली विठ्ठल टवरे 45 वर्षे शिवाजी नगर, मोठे बारगण, अकोट, संगम गणेशराव ठाकरे 32 वर्षे, सागर गणेशराव ठाकरे 36 वर्षे, अमृता संगम ठाकरे 25 वर्ष रा येवडा ता. दर्यापूर जिल्हा अमरावती सध्या मुक्ताई संकुल, कबुतरि मैदान, अकोट, सिमा विजय निंबोकर, 35 वर्ष रा. अकोट नरसिंग कॉलनी या सर्वांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक अल्पवयीन मुलाचा सुध्दा समावेश आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी. अकोट संजीव राऊत, संतोष महाल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, अकोट शहर, प्रकाश अहिरे, राजेश जावरे, रत्नदीप पळसपगार, गणेश पाचपोर, चंद्रकांत ठोंबरे, रणजीत खेडकर,
विलास मिसाळ, उमेश सोनके, उमेश पराये, राजेश वसे, सुलतान पठाण, गोपाल आघाड, गोपाल बुंदे, विजयसिंग चव्हाण, विजय सोनके, दिलीप वाठोरे, दिलीप तायडे, वसीम शेख, संजय डोंगरदिवे, विशाल दंडाळे, विठ्ठल चव्हाण, जवरीलाल जाधव, उदयप्रसाद शुक्ला, अंकुश डोबळे, संतोष कोकाटे, सुनीता दहे, उमा बुटे अकोट शहर. सायबरचे सपोनि. प्रशांत संदे, गणेश सोनोने, गोपाल ठोंबरे आदींनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा