- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola newsletter: Warning heavy rain: पुढील 24 तासात अतिवृष्टी व सुसाट वाराचा इशारा: कोरोना update: उद्याचे लसीकरण कार्यक्रम जाणून घ्या...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola news letter: Warning of heavy rain and wind in next 24 hours: Corona update: Find out tomorrow's vaccination program
अकोला,दि.29: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार पुढील 24 तासामध्ये अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच यादरम्यान ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प 100 टक्के जलसाठा झालेला असुन सर्वच प्रकल्पामधुन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
दिनांक 29/9/21
वेळ : 8.00 AM वाजता
मोर्णा नदी
नदी पातळी ...270.30 M.
उंची......... 1.70 M.
विसर्ग....... 300.76 Cumecs
दिनांक 29/9/21
वेळ : 11.00 AM
मोर्णा नदी
नदी पातळी ...269.90 M.
उंची......... 1.30 M.
विसर्ग....... 205.34 Cumecs
आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.29:आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 305 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860 (43254+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 322004 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 318383 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3219 नमुने होते. आजपर्यंत एकूण 322004 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 278750 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.
15 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) आहे. त्यात 1137 मृत झाले आहेत. तर 56708 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 185 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.28) दिवसभरात झालेल्या 185 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 12, अकोला महानगरपालिका येथे 138, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 31, हेगडेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 185 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.
उद्या दिनांक 30/09/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
3) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
4) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
5)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
6)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
7) GMC अकोला
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
स्पेशल कोविड लसीकरण
SGSPS INSTITUTE OF PHARMACY AKOLA
COVISHIELD 200 Doses( गरजेनुसार वाढविण्यात येतील)
कूपन पद्धतीने
IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला येथे 9 ते 3 या वेळेत राहील
( इतर नागरिकांसाठी सुद्धा नियमित लसीकरण या सत्रा मध्ये सुरू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.)
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2) लेडी हार्डिंग DHW
3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
मनपा शाळा क्रमांक 22
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200कूपन प्रथम तथा द्वितीय डोस ]साठी
सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील
अकोला महानगरपालिका अकोला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा