Akola: Municipal Corporation: तर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा खर्च अकोला मनपाने द्यावा - मदन भरगड



Akola Municipal Corporation should pay the cost of filling the potholes on the road - Madan Bhargad




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोला महानगर पालिकेचा अवाढव्य मालमत्ता कर भरून सुद्धा शहराच्या नागरिकांना मनपा कडून स्वच्छ पिण्याचे पाणी, साफसफाई, विद्युत रोशनाई व विना खडड्याचे रस्ते या सारख्या प्राथमिक सुविधा मिळत नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. येत्या ७ दिवसात अकोला मनपा कडून शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा खड्डे बुजविण्याची मोहीम आम्ही हाती घेणार आहोत. आम्ही ज्या रस्त्याचे खड्डे बुजविणार, त्याला लागणारा खर्च त्या रस्त्यांवरच्या दुकानमालक व घरमालका कडून जमा करून खड्डे बुजविण्यात येईल, तसेच जनतेकडून शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी घेतलेल्या निधीचा पूर्ण हिशोब आपणास सादर करण्यात येईल, असा इशारा वजा विनंती पत्र माजी महापौर मदन भरगड यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.




शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जागो जागी मोठे मोठे खड्डे झाल्यामुळे कोणतेही वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन रोड बनविताना एकही रोडचे काम पूर्ण झालेले नाही. सर्व अर्धवट आहेत. ह्या मुळे ॲक्सीडेंटचे प्रमाण खुप वाढले आहे. खडड्यामुळे नागरिकांना मणक्याचे त्रास वाढले आहे. धुळी मुळे शहरातील नागरिकांना ॲलर्जी व चर्मरोगाचा सामना करावा लागत आहे. 



अवाढव्य टॅक्स नियमित भरूनही नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधा मिळत नाही. शहरातील प्रत्येक भाग गलिच्छ झाला आहे. अनेक भागात घाण पाण्याचे तलाव साचलेले आहेत. नियमित साफसफाई होत नाही. प्रमुख मार्गांसह आंतर मार्ग देखील अत्यंत खराब झालेले आहेत. नागरिकांना प्राथमिक सुविधाच मिळत नाहीत तर टॅक्स तरी कशाला भरायचा असा सवाल सामान्य नागरिक देखील विचारत आहेत.



येत्या सात दिवसात मनपाने प्रमुख रस्त्यांसह आंतर रस्त्यावरील खड्डे बुजवावे.अन्यथा नागरिक स्वखर्चने हे खड्डे बुजवणार आहेत. मात्र, यासाठी लागणारा खर्च मनपाने आपल्या तिजोरीतून द्यावा. जर मनपाने हा खर्च देण्यास इन्कार केला अथवा दिरंगाई केली तर सनदशीर मार्गाने हा खर्च मनपा कडून वसूल करण्यात येईल, अशी चेतावणी देखील मदन भरगड यांनी दिली आहे.



   

"शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जे नागरिक निधी देऊन अकोला महानगर पालिकेला सहकार्य करणार त्यांचा निधी त्यांच्या मालमता कर मध्ये समायोजीत करण्यात यावा." 



मदन भरगड

माजी महापौर



टिप्पण्या