Washim:political news:attack: किरीट सोमय्या यांच्यावर वाशिम येथे शिवसैनिकांकडून हल्ला; गाडीवर दगड व शाई फेक

Kirit Somaiya attacked by Shiv Sainiks at Washim;  Throw stones and ink at the car




वाशिम: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत प्रकरण चाैकशीत आहे. याबाबत पाहणी व अधिक चौकशी करिता भाजप नेते किरीट सोमय्या आज वाशिम दौऱ्यावर होते. मात्र, संतप्त शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर देगाव नजीक दगडफेक करून शाई फेकल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती दस्तुरखुद्द सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 



दरम्यान, सोमय्या यांच्या दौऱ्यानिम्मित काल पासूनच वाशिम मध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. भाजपा-शिव सेना कार्यालय परिसरात देखील कडक बंदोबस्त होता. भाजपा शिवसेना कार्यकर्ते आपसात आमने-सामने भिडणार ही शक्यता लक्षात घेवून, पोलीस खडा पहारा देत होते. तरी सुध्दा हा अनुचित प्रकार घडला.




सोमय्या यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये आधीच प्रचंड राेष हाेता. दरम्यान साेमय्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची माहिती कागदपत्र सह पुरावा देणार हाेते. तत्पूर्वी त्यांनी देगाव येथील पार्टीकल बाेर्डची पाहणी व बंद असलेल्या मार्गाच्या कामाची पाहणी करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या ठिकाणी तेथे जात असतांनाच त्यांच्या वाहनावर दगडफेक व शाई फेक झाली. त्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच परतावे लागले.



शिवसैनिकांना अटक

या घटनेनंतर पत्रकार परिषद नियोजित स्थळी व शहरात इतर ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला. दरम्यान वाशिम शहरात आयोजित पत्रकार परिषद सुरु हाेण्यापूर्वी काही शिवसैनिक यांनी भाजपा कार्यालयाकडे धावा केला. मात्र पोलिसांनी त्यांना मधातच राेखून अटक केली.



सोमय्या यांनी समाज माध्यमातून दिली माहिती

"शिवसेनेच्या गुंडांनी माझ्या कारवर हल्ला केला, माझ्या कारवर 3 मोठे दगड फेकले, दुपारी 12.30 वाजता माझी गाडी बालाजी पार्टिकल्स बोर्ड कारखानाकडे वाशिममधून जात असताना घटना घडली."


किरीट सोमय्या

भाजप नेते




अकोला येथे स्वागत


तत्पूर्वी, अकोला शहरात भाजप तर्फे वरिष्ठ नेते राजेंद्र पाटणी,विजय अग्रवाल,देवाशीष काकड आदींनी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे स्वागत केले.




टिप्पण्या