Tokyo Olympics 2020: नीरज चोप्राने रचला इतिहास;भालाफेक मध्ये भारताला सुवर्णपदक, बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक

                    क्रीडांगण

           नीलिमा शिंगणे-जगड

Tokyo Olympics 2020: Neeraj Chopra makes history; India wins gold in javelin throw,bajrang puniya win bronze medal






टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आजचा शनिवारचा दिवस भारतासाठी भाग्यशाली ठरला असेच म्हणावे लागेल. भालाफेक  खेळ प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने  सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याच्या या विजयाने भारताची मान अभिमानाने उंच झाली आहे. नीरज हा ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर भालाफेक मध्ये पहिल्यांदाच भारताने सुवर्णपदक मिळविले आहे. या विजयाबरोबर नीरजने आपल्या नावे एक इतिहास रचला. तर बजरंग पुनिया याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.


ऑलिंपिकमध्ये पहिले सुवर्ण पदक

बिजिंग ऑलिंपिक २००८ स्पर्धेत १० मीटर एअर रायफल या खेळात अभिनव बिंद्राने पटकाविले होते.




पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला. अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.

……..


पंतप्रधान मोदी यांनी केले कौतूक

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरजने अतिशय उत्कटतेने खेळ करत अतुलनीय धैर्य दाखवले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. .


आपल्या ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;


"टोकियोमध्ये इतिहास लिहिला गेला आहे ! आज @Neeraj_chopra1 ने जे साध्य केले ते कायम स्मरणात  राहील. युवा  नीरजने चमकदार कामगिरी केली आहे.नीरजने अतिशय उत्कटतेने खेळ करत अतुलनीय धैर्य दाखवले .  सुवर्णपदक  जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. 



बजरंग पुनीयाचे अभिनंदन


टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे.


एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;


" #Tokyo2020 मधील आनंददायी बातमी! दिमाखदार विजय @BajrangPunia.. तुमच्या या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन,  प्रत्येक भारतीयासाठी  अभिमान आणि आनंदाची बाब आहे ."




टिप्पण्या

  1. भूगोल ही परमेश्वराची देणगी असेल तर इतिहास हे मानवाचे मनगट आहे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच ग्रामपंचायत सोनगाव सोसायटी श्री संत कृष्णाजी बाबा तरुण मित्र मंडळ प्रवारा तालीम संघ

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा