Thrilling search operation: अखेर अभिषेक गवईचा शोध पूर्ण: मोर्णानदी पात्रात मृतदेह आढळला; संत गाडगेबाबा पथकाचे थरारक सर्च ऑपरेशन




Abhishek Gavai's search finally completed: Body found in Morna river;  Thrilling search operation of Sant Gadge Baba Squad





* मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची यशस्वी कामगिरी




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: सिंधी कॅम्प परिसरातील युवक अभिषेक गवई हा 22 ऑगस्ट रोजी मोर्णा नदीत बुडल्याची घटना घडली होती.घटना कळताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शोधाशोध केली. मात्र, अभिषेक दिसून आला नाही.आज अखेर चार तासाच्या अथक शोध कार्यात 20 फूट खोल डोहात अभिषेकचा मृतदेहच आढळला. अभिषेकचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. थरारक असे अंडर वॉटर सर्च ऑपरेशन राबवून संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने अभिषेकचा शोध घेवून मृतदेह डोहातून बाहेर काढण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, महात्मा ज्योतिबा फुले नगर सिंधी कॅम्प येथील रहिवासी अभिषेक गवई (वय अं. 20 वर्ष) हा तरुण 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी मोर्णा नदी पात्रात बुडाल्याची माहिती अकोला तहसिलदार अरखराव यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. काल पासुन स्थानिकांनी शोध घेतला असता नदीतील डोहात 20 फुट खोल पाणी असल्याने काहीच मिळून आले नाही.



  

आज सकाळी लगेच जिवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, अंकुश सदाफळे, गोकुळ तायडे, आकाश बगाडे, संकेत देशमुख हे शोध व बचाव साहीत्यासह सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहचून, मोर्णा नदीत सर्च ऑपरेशन सुरू केले. 



पथकाने रेस्क्यु बोटच्या सहाय्याने सतत प्रयत्न केला परंतू, डोह असल्याने त्यात 15-20 फुट खोल पाणी असल्याने मृतदेह सापडत नव्हता. यावेळी सकाळी आठ वाजता पासुन ते 12 वाजे पर्यंत सारखे अंडरवाॅटर सर्च ऑपरेशन चालुच ठेवले. शेवटी तळाशी असलेल्या अभिषेक गवईचा मृतदेह  जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी शोधुन वरती आणलाच. यावेळी तहसीलदार अरखराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे ,खदान पो.स्टे.ठाणेदार सनस आणि अग्निशमन दलाची टीम हजर होती, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.



दीपक सदाफळे आणि टीमचे कौतूक



आज मोर्णानदीतील जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी केलेले थरारक अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन स्वतः सनस यांनी अनुभवले. यामुळे मानव सेवा सामाजिक आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी यांचा खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार सनस यांनी खदान पोलीस स्टेशन येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.



या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक/टॅप करा

टिप्पण्या