slab collapsed:Exclusive news: रणपिसे नगरात घराचा स्लॅब कोसळला; मलब्याखाली येवून एकाचा दुर्दैवी अंत

A slab of a house collapsed in the  Ranpise nagar;  The unfortunate end of one coming under the rubble




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : रणपिसे नगर येथील घराचे बांधकाम सुरू असतांना स्लॅब कोसळल्याने एका मजुराचा मालब्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव शुभम किर्तक असे आहे.


दोघांचे वाचले प्राण

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला शहरातील रणपिसे नगर येथील शिक्षक शरद हिंगे यांच्या घराचं बांधकाम सुरू असतांना वरच्या मजल्यावरील स्लॅब पाडण्याच काम सुरू होते. या स्लॅबच्या खाली तीन मजूर काम करत होते. अचानक बाजूला असलेल्या भिंतीला तड गेला आणि स्लॅब कोसळला. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र प्रसंगावधान राखल्याने दोन मजूरांचा प्राण यातून वाचला.



जॅकच्या साह्याने काढले बाहेर

दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर दलाच्या कर्मचाऱ्यांनी जॅकच्या साहाय्याने मजुराला बाहेर काढण्यात आले. मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल असता डॉक्टरांनी मजुराला मृत घोषित केले. मृतकचे नाव शुभम किर्तक (रा.गुळधी) असे आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.




घटनास्थळी उपजिल्हाधिकारी पोहचले

घटनास्थळी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे आणि महापालिका उपआयुक्त वैभव आवारे यांनी भेट दिली. संजय खडसे यांनी बचवकार्यासाठी यंत्रणेशी संपर्क साधून कार्य गतिमान केले आहे. 

टिप्पण्या