Makhram Pawar: Laxmanrao Hage : माजी मंत्री मखराम पवार व जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव हागे काळाच्या पडद्याआड



Former minister Makharam Pawar and senior journalist Laxmanrao Hage behind the scenes



अकोला : गोर बंजारा समाजाचे नेते तसेच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे आज रविवार 8 ऑगस्ट रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. तर जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव हागे यांचे दुपारी 2 वाजता निधन झाले.



लोहगड येथे पवार यांच्यावर होणार अंतिम संस्कार


मखराम पवार यांनी मुंबई मधील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथे त्यांच्या मुळ गावात सोमवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात, दोन मुले, एक मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे.




मखराम पवार यांचा जीवन प्रवास 


मखराम पवार हे १९९० मध्ये मुर्तीजापूर मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले . त्यानंतर १९९८ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हूणन निवडून गेले. २७ ऑक्टोबर १९९८ ते ८ जानेवरी २००१ या काळात त्यांनी राज्याचे व्यापार व वाणिज्य, दारुबंदी प्रचार कार्य, खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. 



जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव हागे यांचे निधन


जेष्ठ पत्रकार, साहीत्यिक,साप्ताहिक इरींग मिरींगचे संपादक लक्ष्मणराव हागे यांचे आज हृदय विकाराच्या झटक्यात दुपारी 2 वाजता  निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. अंत्यविधि आज सांयकाळी 6 वा मोहता मिल मोक्षधाम येथे करण्यात येईल. 


आठ दिवसांपूर्वीच 31 जुलै रोजी पातूर येथे झालेल्या अकोला जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणी सभेत  त्यानी पत्रकारांच्या पेंशनबाबत प्रश्न माडंला होता. 



मखराम पवार आणि लक्ष्मणराव हागे यांना अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  शौकतअली मिरसाहेब, सिद्धार्थ शर्मा सह कार्यकारिणीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


टिप्पण्या