Lokmanya Tilak Punyatithi 2021: अकोला: बहूभाषिक सर्वशाखीय ब्राह्मण संघटनांतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त सामूहिक आदरांजली

Collective tributes on the occasion of Lokmanya Tilak Punyatithi by multilingual multi-disciplinary Brahmin organizations



ठळक मुद्दा

आमदार गोवर्धन शर्मा यांनी विकास निधीमधून 10 लक्ष रुपये देण्याची केली घोषणा




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: थोर स्वतंत्रता सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यतिथीनिमित्त आज अकोल्यातील बहुभाषिक सर्व शाखीय ब्राह्मण संघटनांच्या वतीने मनपा चौक टिळक पुतळा येथे एकत्र येवून आदरांजली वाहण्यात आली.


सर्वप्रथम आमदार  गोवर्धन शर्मा व विविध महासंघ संघटनांचे पदाधिकारी यांचे हस्ते लोकमान्य टिळकांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी अभिवादन सभेमध्ये आमदार गोवर्धन शर्मा यांनी पुतळा परिसरात दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून 10 लक्ष विकासकामासाठी देण्याचे तसेच या विषयाचा प्रशासनाकडे पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे जाहीर केले.  तसेच पत्र महासंघाचे पदाधिकारी अमोल चिंचाळे, मोहन गद्रे, कुशल सेनाड, अश्विन पांडे यांना सुपूर्द केले.




त्यानंतर आमदार गोवर्धन शर्मा यांनी टिळकांच्या राष्ट्रप्रथम संकल्पनेची आजच्या काळात किती नितांत आवश्यकता आहे आणि समाजामध्ये संघटनेची गरज याविषयी उपस्थितांना सांगितले.



या कार्यक्रमास अकोल्यातील विविध ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन ब्राह्मण महासंघ अकोला शाखाच्या वतीने करण्यात आले.


याप्रसंगी विविध ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी अमोल चिंचाळे गुरुजी, मोहन गद्रे, जयंत मराठे, कुशल सेनाड, अश्विन पांडे, पवन जोशी, उज्ज्वल जोशी, लक्ष्मीकांत रेलकर, अनिल धर्माधिकारी,  समीर भालेराव,वैभव धडाधडी,  प्रकाश दाणी, आशुतोष शुक्ल, श्याम चेंडके, मुळे गुरुजी, कपिल रावदेव, राहुल भजनी,  रोहित देशमुख, नंदुजी मोडक, माजी सभापती सुनील शुक्ला, दीपक मायी,  मिलिंद गद्रे,  राजू फडके, अजय फडके,  गोपाल शर्मा, विशाल जोशी, वामनराव फडके, नगरसेवक गिरीश जोशी,  नगरसेवक गिरीश गोखले, शशिकांत पांडे,  अमोल कुलकर्णी, शिवम जोशी, प्रसाद रानडे, अद्वेत रानडे, पंकज मिश्रा, प्रकाश राजवैद्य, बाळू जोशी, राजेश व्याघ्राम्बरे,  आशिष पांडे, यशोधन गोडबोले आदी उपस्थित होते.

टिप्पण्या