- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: अहमदनगर येथून लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडी घेवून आलेल्या एका उभ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये प्रवासी बसलेले नसल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सध्या आग आटोक्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील एका हॉटेल परिसरात ही घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जवळील हॉटेल जलसा येथे होणाऱ्या लग्नसमारंभासाठी अहमदनगर येथील खाजगी लक्झरी बस वऱ्हाडी घेऊन आली होती. यादरम्यान उभ्या असलेल्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली. आग लागली त्यावेळी सुदैवाने बस मध्ये प्रवासी नव्हते. यामुळे कोणतीही जीवित हानी टळली. मात्र, खासगी बसचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. खासगी लक्झरी बस मधील वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी जुने शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बघेकऱ्यांनी गर्दी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा