Court news: murder case:Akot: माठात उष्टा ग्लास टाकल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाची हत्या;आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

                                      file image



अकोला: माठामध्ये उष्टा ग्लास का टाकला, या क्षुल्लक कारणावरून आरोपीने त्याच्या घरात राहत असलेल्या आठ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी घडली. यानंतर यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीस 8 ऑगस्ट रोजी अटक केली. आरोपी आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 13 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



अकोट येथील अतिरिक्त जिला न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी तेल्हारा पोस्टे. येथील अप क ३२३/२०२९ भादंवि कलम ३०२. सहकलम ३(२) अट्रोसिटी अक्ट प्रकरणातील आरोपी संजय शामराव नवलकार वय ३० वर्ष रा. वाडी अदमपूर याने घरामध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलाची अतिशय निर्दयपणे हत्या केल्याच्या आरोपाचा तपास करण्याकरिता या आरोपीची १३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रवानगी केली.



या प्रकरणामध्ये  तपास अधिकारी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम अकोट सत्र न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी तर आरोपी तर्फे ऍड.मनोज वर्मा यांनी युक्तीवाद केल्यानंतर न्यायलयाने आरोपीस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारीत केला. 



आदेशामध्ये नमूद केले की, हा प्रकार  अत्यंत गंभीर आहे. यातील संपूर्ण पुरावा निष्पन्न करणे आहे. साथीदाराची आणि आरोपीची आवश्यक आहे. आरोपीच्या रक्ताचे नमूने घ्यावयाचे आहेत. फिर्यादी व आरोपीच्या नाते संबंधाबाबत तपास आवश्यक आहे. गुन्हयातील सर्व तथ्य परिस्थिती आणि कारणासंबंधी तपास होणे आवश्यक आहे. या कारणावरून आरोपीस १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केला आहे.

टिप्पण्या