Bhavana Gawali:EDRaid:वाशिम: खासदार भावना गवळी ईडीच्या रडारावर; वाशिम येथे एकाच वेळी पाच ठिकाणी कारवाई




वाशिम: परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसूली संचालयाने (Enforcement Directorate) नोटीस पाठवल्यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशिम येथील मालमत्तांवर ईडीने कारवाई सुरू केली आहे. आज सकाळ पासूनच कारवाईला सुरुवात झाली आहे. यामुळे पश्चिम विदर्भात खळबळ उडाली आहे. 



 


खासदार भावना गवळी यांचा थेट संबंध असलेल्या ठिकाणांपैकी महिला प्रतिष्ठान, बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था, बीएएमएस कॉलेज, भानवा ऍग्रो प्रॉडक्ट याठिकानी ईडीने धाड टाकून कारवाई सुरू केली आहे. एकूण 100 कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. 




एकंदरीत यासर्व प्रकारामुळे आता शिवसेना -भाजपमध्ये मधील वाद अधिक उफाळून येणार असल्याचे सध्या चित्र रंगात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या  यांच्या यादीत आता पुढचा नंबर कोणाचा असणार, अश्या चर्चांना आता उधाण आले आहे.



शिवसेना खासदार भावना गवळी यांनी  ₹ 100 कोटीचा घोटाळा. ₹18 कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ₹ 7 कोटी रोख ठेवणे NCDC, SBIला फसविले असल्याचा असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यमंत्री फायनान्स (बँकिंग) डॉ कराड, राज्यमंत्री फायनान्स (महसूल  आयकर) पंकज चौधरी, राज्यमंत्री सहकार बी एल वर्मा यांना भेटलो असून लवकर कारवाई होणार,असे संकेत दोन चार दिवस आधी किरीट सोमय्या यांनी दिले होते.




त्यानंतर ठाकरे सरकार की "महान" अकरा असे ट्विट करीत किरीट सोमय्या यांनी अकरा जणांची यादीच जाहीर केली आहे.



 1. प्रताप सरनाईक


 2. अनिल देशमुख


 3. अनिल परब


 4. भावना गवळी


 5. महापौर किशोरी पेडणेकर


 6. रवींद्र वायकर


 7. जितेंद्र आव्हाड


 8. छगन भुजबळ


 9. यशवंत जाधव BMC

     अध्यक्ष


 10. आमदार यामिनी जाधव


 11. मिलिंद नार्वेकर






टिप्पण्या