Alert: Rain: thunderstorms सतर्कतेचा इशारा: अकोल्यात 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान विजांच्या कडकडासह पर्जन्यमान; नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Alert: Rain with light to moderate thunderstorms; Urge all villagers to be vigilant



अकोला:  प्रादेशिक मोसम केंद्र भारत मौसम विज्ञान विभाग, नागपूर यांच्या  संदेशानुसार अकोला जिल्ह्यामध्ये 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान हल्का व मध्यम अधिक स्वरुपाचे विजांच्या कडकडासह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.


काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष यांचे प्राप्त संदेशानुसार मंजूर जलायशय परिचलन आराखड्यानुसार  31 ऑगस्ट पर्यंत प्रकल्पात 95 टक्के पाणी साठविण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा सेवा सुरु आहे. काटेपूर्णा जलाशयामध्ये पाण्याची आवक लक्षात घेता जलाशयात येत्या पाच ते सहा तासात 95 टक्के पाणीसाठा पूर्ण होईल असा अंदाज आहे व त्यानंतर येणारे पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येईल. तरी कोटपूर्णा नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहवे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



पोपटखेड प्रकल्प ता. अकोट प्रकल्पाचे दोन गेट 10 से.मी. उघडून 5.56 क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे / कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. 



अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 



नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना व पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करू नये. 


पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. 



संबंधीत अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहून योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

टिप्पण्या