800 crore scam:political news: महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातील 800 कोटी महाघोटाळ्याची सखोल चौकशी करा; खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी


राजकारण:गल्ली ते दिल्ली
नीलिमा शिंगणे-जगड

Investigate the Rs 800 crore scam in the Women and Child Welfare Department of Maharashtra;  MP Navneet Rana made the demand after meeting Union Minister Smriti Irani in person





महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य जरुरी वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुचा मृत्यू झाला असल्याबाबतची तक्रार खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांचेकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील यावेळी खासदार  राणा यांनी केंद्रीय मंत्री इराणी यांच्याकडे आज केली. 




उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले असल्याचे देखील नवनीत राणा यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.



राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत व त्यांच्याच गृह जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे, ही गोष्ट अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी आहे, नवनीत  राणा यांनी स्मृती इराणी यांना अवगत केले.




कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे नवनीत राणा यांनी स्मृती इराणी यांच्या लक्षात आणून दिले. तसेच या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व  या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार  राणा यांनी यावेळी केली.




मेळघाटातील अशिक्षित आदिवासी महिलांची फसवणूक एका महिला पालकमंत्री व महिला बालविकास कॅबिनेट मंत्र्यांच्या विभागात व गृह जिल्ह्यात होऊनही स्वतः महिला असणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची साधी दखलही न घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी देणे होय किंवा यांचा त्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे मत नवनीत  राणा  यांनी यावेळी स्मृती इराणी यांचेकडे व्यक्त केले.



आदिवासी माता किंवा नवजात शिशु यांच्यासाठी असणाऱ्या या लोककल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्यक्षात त्यांना न मिळता त्यांच्या हिश्याचे वस्तू वाटप न करता संबंधित ब्लॅक लिस्टेड कंपनी व त्यांचे पाठीराखे हा मलिदा लाटत असून सखोल चौकशी झाल्यास हा महाभ्रष्टाचार 1000 ते 1500 कोटींचा असल्याचे सुद्धा निष्पन्न होऊ शकते,म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश द्यावे. दोषींविरोधात एफ आय आर नोंदवावा व कोणी कितीही मोठे असले तरी या संपूर्ण प्रकाराची पाळेमुळे खोदून काढून त्यांना कठोर शिक्षा करावी व आदिवासींना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.



या धक्कादायक प्रकाराने स्मृती इराणी सुदधा प्रचंड व्यथित झाल्या व खासदार  नवनीत राणा यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून त्यांनी तात्काळ सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन दिले.




खासदार नवणीत राणा यांच्या या पत्रामुळे आता या विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार असून आदिवासी माता व नवजात शिशु यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

टिप्पण्या