- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Union cabinet expansion: नारायण राणे यांच्या शपथ विधिनंतर कोकणात जल्लोष; शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचा प्रयत्न!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर काही विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे यांना संधी दिली असून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राणे यांनी शपथ घेतल्यानंतर विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला.
नारायण राणे यांची केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी मिठाई वाटून आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडला. यात एकूण ४३ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांनाही स्थान दिले गेले . यात अश्विनी वैष्णव आणि रामचंद्र प्रसाद यांचा समावेश आहे. अश्विनी वैष्णव यांनी आयएएस अधिकारी असताना अनेक लक्षवेधी कामे केली आहेत.
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. राणे शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
कपिल पाटील ओबीसी समाजातून येतात. सध्या राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय तापला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळालेआहे. भारती पवार दिंडोरीच्या खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या जवळपास दोन लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आल्या. तर डॉ. भागवत कराड राज्यसभेचे सदस्य आहेत. संघटनात्मक पातळीवर त्यांनी पक्षासाठी उत्तम काम केले आहे.
असा आहे मंत्रिमंडळ विस्तार
पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून खालील व्यक्तींची नेमणूक केली आहे:
कॅबिनेट मंत्री
1. श्री नारायण तातू राणे
2. श्री सर्वानंद सोनोवाल
3. डॉ. वीरेंद्र कुमार
4. श्री ज्योतिरादित्य एम सिंधिया
5. श्री रामचंद्र प्रसाद सिंह
6. श्री अश्विनी वैष्णव
7. श्री पशु पति कुमार पारस
8. श्री किरेन रिजिजू
9. श्री राज कुमार सिंह
10. श्री हरदीप सिंग पुरी
11. श्री.मनसुख मांडवीय
12. श्री भूपेंद्र यादव
13. श्री परषोत्तम रुपाला
14. श्री जी. किशन रेड्डी
15. श्री अनुरागसिंग ठाकूर
राज्यमंत्री
1. श्री पंकज चौधरी
2. श्रीमती. अनुप्रिया सिंह पटेल
3. डॉ. सत्य पाल सिंग बाघेल
4. श्री राजीव चंद्रशेखर
5. सुश्री शोभा करंदलाजे
6. श्री भानु प्रताप सिंह वर्मा
7. श्रीमती. दर्शना विक्रम जरदोष
8. श्रीमती. मीनाक्षी लेखी
9. श्रीमती. अन्नपूर्णा देवी
10. श्री ए. नारायणस्वामी
11. श्री कौशल किशोर
12. श्री अजय भट्ट
13. श्री बी. एल. वर्मा
14. श्री अजय कुमार
15. श्री चौहान देवूसिंह
16. श्री भगवंत खुबा
17. श्री कपिल मोरेश्वर पाटील
18. सुश्री प्रतिमा भौमिक
19. डॉ.सुभाष सरकार
20. डॉ भागवत किशनराव कराड
21. डॉ.राजकुमार रंजन सिंह
22. डॉ. भारती प्रवीण पवार
23. श्री विश्वेश्वर टुडू
24. श्री शांतनु ठाकूर
25. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
26. श्री जॉन बारला
27. डॉ एल. मुरुगन
28. श्री निसिथ प्रामाणिक
राष्ट्रपतींनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात मंत्रीमंडळाच्या वरील सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी तात्काळ प्रभावाने मंत्रीमंडळातील खालील सदस्यांचा राजीनामा स्वीकारला आहे
श्री डी.व्ही. सदानंद गौडा
श्री रविशंकर प्रसाद
श्री थावरचंद गेहलोत
श्री रमेश पोखरियाल ‘निशंक’
डॉ. हर्ष वर्धन
श्री प्रकाश जावडेकर
श्री संतोष कुमार गंगवार
श्री बाबुल सुप्रियो
श्री संजय शामराव धोत्रे
श्री रत्तन लाल कटारिया
श्री प्रताप चंद्र सारंगी
श्रीमती देबश्री चौधरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा