Union: Cabinet: Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनीअर; काहींचे वय 50 च्या आत!

Union Cabinet Expansion: 13 lawyers, 6 doctors, 5 engineers in PM Modi's new cabinet;  Some under the age of 50! (File pic)






नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवे मंत्रिमंडळात तरुण आणि शिक्षित लोकांना स्थान मिळणार असल्याचे समोर असले आहे. यामध्ये प्रामुख्याने वकील,डॉक्टर, इंजिनिअर असलेल्यांना स्थान देण्यात येणार असल्याचे कळते.




प्राप्त माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांना जागा मिळणार आहे. तसेच 13 वकील, 6 डॉक्टर आणि 5 इंजिनिअर्स यांना देखील स्थान देण्यात आले आहे. यात 14 मंत्री असे असतील, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षाही कमी असेल.


मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांसह 18 माजी राज्यमंत्री, 39 माजी आमदार आणि 23 असे खासदारही असतील, जे तीन अथवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत.


 

मंत्रिमंडळात ज्यांना जागा मिळणार, त्यात 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर, 7 माजी सिव्हिल सर्व्हंट आहेत. याच बरोबर, 46 जण असेही आहेत, ज्यांना केंद्र सरकारमध्ये कामाचा अनुभव आहे. मंत्रिमंडळाचे सरासरी वय आता 58 वर्ष एवढे आहे. यातील 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 पेक्षा कमी असेल. याशिवाय या मंत्रिमंडळात 11 महिलांनाही स्थान दिली जाईल. यांपैकी दोन कॅबिनेट मंत्री असतील,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मंत्रिमंडळ विस्तार घोषित होण्यास अवघे काही तासच शिल्लक राहिले आहे.त्यामुळे ही बाब समीर येईलच, याशिवाय कोणाची वर्णी मंत्रिमंडळ लागेल,हे देखील स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या