Tokyo olympic: ऑलम्पिक स्पर्धेनिमित्त अकोल्यात 18 वर्षावरील खेळाडूंचे लसीकरण

                                      file photo





अकोला: ऑलिम्पिक स्पर्धा हा क्रीडा विभागाकरीता कुंभ मेळावा असतो. कोविड-19 च्या जागतिक महामारीमुळे ऑलिम्पिक स्पर्धा टाळण्यात आले. परंतु आता टोकीया ऑलिम्पिक स्पर्धा आशिया खंडात आयोजित करण्यात येत आहे. टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दि. 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील क्रीडाप्रेमी व खेळाडूंमध्ये आनंदाचे उधान बहरत असून या उधानाला बहरण्याची संधी देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.




ऑलिम्पिक दिन ते टोकीया ऑलिम्पिक  (23 जून ते 23 जुलै) उद्घाटनाचे औचित्य साधुन ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहनासाठी व खेळाचे वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रमांचे ऑनलाईन प्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले आहे. देशात व राज्यात वेगाने कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचे कार्यक्रम चालू आहे. त्यानुसार सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना यांना आवाहन करण्यात येत आहे की राज्य, राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय खेळाडूंनी कोविड-19 लसीकरण केले आहे अथवा नाही याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुण्यात  22 जुलै  पर्यंत कार्यालयीन वेळेत द्यावी. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी ठाकरे यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून विहित नमुण्यात माहिती भरुन द्यावी,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या