relief fund: flood affected:village: पालकमंत्री बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप






अकोला: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पनोरी ता.अकोट येथील दिवंगत मुरलीधर आनंदा बुटे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली.



मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. आज पालकमंत्री ना.कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केले. बुटे यांचा मुलगा महेश व मुलगी वैष्णवी असे दोघेच वारस आहेत. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांनी सुपूर्द केला. 


या कुटुंबाला अन्य योजनांमधून मदत मिळवून देऊ,तसेच त्यांचे घराचे पुर्णतः नुकसान झाले असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ. शिवाय मुलगा महेश याला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वस्त केले. पनोरी गावच्या नाल्याचे खोलीकरण, तसेच गावच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येतील,असेही ना.कडू यांनी सांगितले.


यावेळी पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार निलेश मडके, गट विकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.


पूरग्रस्त गावांनजीक नाल्यांचे खोलीकरण प्राधान्याने


Priority of deepening of nallas near flood affected villages


यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना ना.कडू म्हणाले की, जिल्ह्यात जिथे जिथे नाल्याचे पाणी गावात शिरून पुरामुळे नुकसान झाले तेथे नाला खोलीकरण काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राधान्याने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.



विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण


Bhumi Pujan, Lokarpan of development works by Omprakash alias Bachchu Kadu


अकोट तालुक्यातील ग्रा.पं. तरोडा येथे ग्रामपंचायत सभागृह भुमिपूजन ना. कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर लोतखेड येथे ग्रामपंचायत भवन इमारत व  व्यायामशाळा लोकार्पण  हे कार्यक्रमही ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोतखेड येथे दिव्यांग व्यक्तिंचे अनुदानाचे धनादेश तसेच शिधापत्रिकांचे वाटप ही  पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.



आसेगाव बाजार येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किट व मदत अनुदान वाटप



Flood prevention measures will be implemented along with relief and rehabilitation - Guardian Minister Bachchu Kadu;  Distribution of essential kits and relief grants at Asegaon Bazar




जिल्ह्यात तसेच राज्यात पूरस्थिती निर्माण झाली.त्यामुळे लोकांचे नुकसान झाले. या सर्व लोकांना मदत व पुनर्वसन करण्या सोबत आता पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन ना.बच्चू कडू यांनी आज आसेगाव बाजार येथे केले.



आसेगाव बाजार येथे आज ना.कडू यांच्या हस्ते पुरबाधितांना अन्नधान्य किटचे तसेच सानुग्रह अनुदान मदत धनादेश वाटप करण्यात आले.


यावेळी सरपंच निलेश ताडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार निलेश मडके, गट विकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


सानुग्रह अनुदान वाटपास अकोल्यात सर्वात आधी सुरुवात



Sanugrah grant distribution started first in Akola


यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना ना.कडू म्हणाले की, गावात पुरामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी नाला खोलीकरण, पूर संरक्षक भिंत बांधकाम यासारखी कामे करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अन्नधान्य किट वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम आपण राबविला. हा बहुदा राज्यातील पहिलाच प्रयत्न आहे. तसेच राज्यात अकोला जिल्ह्यात सानुग्रह मदत वाटपासाठी सर्वात आधी सुरुवात झाली, असा उल्लेखही ना.कडू यांनी केला. नुकसानीचा पंचनामा करून पंचनाम्याची प्रत नुकसान ग्रस्त कुटुंबाला दोन दिवसात द्यावी,असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.



टिप्पण्या