Rains wreak havoc in Mumbai: मुंबईत पावसाचा हाहाकार: घरांवर दरड कोसळल्याने 14 मृत्युमुखी; रेल्वे वाहतूक विस्कळीत

Rains wreak havoc in Mumbai: 14 killed as houses collapse;  Railway traffic disrupted




मुंबई: पावसाने शनिवारी रात्री सुमारास  जोरदार हजेरी लावल्याने मुंबई व उपनगरात हाहाकार झाला.अनेक घरांवर दरड कोसळल्याने व भिंती पडल्याने आता पर्यंत 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बचाव व शोध कार्य सुरू आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. दरम्यान, अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले असल्याचे चित्र आहे.





शनिवार रात्री मुंबई आणि उपनगरांतील  विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.  कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली, फोर्ट परिसराला पावसाने दणका दिला आहे. वाशीनाका, चेंबूरमध्ये जोरदार पाऊस झाला. दरम्यान, काही घरांवर दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. तसेच यामध्ये 6 ते 8 जण अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, ठाणे आणि रायगडमध्येही मुसळधार पाऊस बरसला असल्याची माहिती मिळाली. 




विक्रोळीत तिघांचा मृत्यू

विक्रोळी मधील सुर्यनगर येथे आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसल्याने 8 घरे कोसळल्याचे समजते. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. रामनाथ तिवारी (45), अनिकेत रामनाथ तिवारी (23), कविता रामनाथ तिवारी (42) अशी मृतकांची नावे आहेत. तर नितू तिवारी (23) या जखमी आहेत. अजूनही 7 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य पथक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.



वाहतुकीवर परिणाम


मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर होवून, अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे सुरळीत असल्याची माहिती रेल्वेकडून प्राप्त झाली आहे. 



फर्स्ट डाऊन लोकल चर्चगेट येथून 6.40 वाजता सुरू झाली होती. पहिली यूपी लोकल बोरिवली येथून 6.40 वाजता सुटली होती. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी - वाशी या दरम्यान लोकल गाड्या सुरु नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पावसामुळे संपूर्ण वसई-विरार जलमय झाला असून रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने रेल्वे सेवा पूर्णतः बंद झाली असल्याचे समजते. 


Latest update

Central Railway Monsoon Updates at 09.00 hrs on 18.7.2021. 





Central railway monsoon update

Trains short terminated, cancelled, rescheduled and trains short originating on 18.7.2021 due to heavy rains


(माहिती स्रोत:सेंट्रल रेल्वे)



टिप्पण्या