Political news: face to face: मुख्यमंत्री ठाकरे व देवेंद्र फडणवीस आले आमने सामने! काय घडलं या ऐतिहासिक भेटीत? जाणून घ्या

Political news: Chief Minister Thackeray and Devendra Fadnavis come face to face




कोल्हापुर: शाहुवाडी चौकात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज समोरासमोर आले होते. या अचानक झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी हे दोन्ही नेते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. 




दौरा दरम्यान, आज ते कोल्हापुरात आलेले असताना, शाहुवाडी चौकात हे दोघेही नेते आमने सामने आले. यावेळी त्यांच्यात काही चर्चा झाल्याने, राज्यभर या एतिहासिक घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नेमकी काय चर्चा झाली याबाबत माध्यमांना माहिती दिली.




देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमची तिथं एवढीच चर्चा झाली की, या परिस्थीवर काहीतरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे. तातडीची मदत तर तत्काळ दिलीच पाहिजे पण अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना त्यावर काय होऊ शकेल? हा प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच, मी त्यांना सांगितले की त्यांनी जर बैठक बोलावली तर आम्ही यायला तयार आहोत.”



काय म्हणाले मुख्यमंत्री

Chief Minister Thackeray and Devendra Fadnavis come face to face


पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटी संदर्भात प्रश्न विचारला गेला. यावेळी ठाकरे यांनी सांगितले की, पॅकेजची घोषणा करायला उशीर का असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यावर मी पॅकेज मुख्यमंत्री नसून लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री आहेत ते सुद्धा मदत करण्यासाठी तत्पर आहेत. संपूर्ण परिस्थिती आणि पंचनामा झाल्यावर मदत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.


देवेंद्र फडणवीस हे इकडेच आहेत मला कळल्यावर मी त्यांना सांगितलं थांबा मी येतोय. याचं कारण मला नागरिकांच्या जीवाशी खेळायचं नाही. राजकारण करायचं नाही. त्यांच्याही काही सूचना असतील तर त्याचंही आम्ही स्वागत करु. आमच्यात तेथे बोलणं झालं ते खुलेआम झाले, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.





टिप्पण्या