- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
NTSE result:India: प्रज्ञाशोध परिक्षेचा निकाल जाहीर; अकोला जिल्ह्याने तब्बल 16 शिष्यवृत्त्या पटकाविल्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी सोळा विद्यार्थी NTSE शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे. या हेतूने दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. संपूर्ण भारतातून 2000 विद्यार्थ्याना ही शिष्यृत्ती देण्यात येते त्यापैकी एकट्या अकोलाने 16 शिष्यवृत्त्या पटकाविल्या आहेत.
इयत्ता दहावीसाठी झालेल्या ही राज्यस्तरीय चाचणी परीक्षा (लेवल-२) अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यात नेत्रदीपक यश मिळविले .
शिष्यवृत्ती धारकांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल
१. शालांत परीक्षेनंतर +२ स्तरावर दोन वर्ष (इ.११ वी व इ. १२ वी)-१२५०/-
२. सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत (उदा. B.A., B.COM.,B.Sc)-२०००/-
३. सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत(पदव्युत्तर पदवीपर्यंत)-२०००/-
४. Ph.D. साठी ४ वर्षापर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी)- विद्यापीठ आयोगाचे नियमानुसार मान्य दराने.
सत्र २०२० मधील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक अकोल्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची यादी
प्रभात किड्स स्कूल अकोला मधून ख्याती नितीन लोया, साहिल राजू वाडकर, तनया भास्कर काकड, अथर्व सुधाकर डाबेराव
पोदार इंटरनॅशनल स्कूल अकोला मधून कुलदीप संदीप ठाकरे, लक्षित अनुप संतानी, यश रामेश्वर चव्हाण
माउंट कारमेल स्कूल अकोला मधून
पार्थ संदीप फडके, अक्षय संदीप पारस्कर, अनिश नितीन गावंडे, श्रिया मंगेश तुळस्कर
स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड अकोला मधून नचिकेत सुरेश महल्ले, ओम अतुल गायकवाड, राजनंदिनी महेश मंडाने
हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल अकोला मधून
आदित्य सुरेश साहू, ध्रुव शशांक फुरसुले हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समितीच्या वतीने NTSE शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संयोजक डॉ. रविंद्र भास्कर , शशिकांत बांगर, सुकुमार नवले , प्रताप देशपांडे, सुधाकर मेतकर , भरतकुमार लाड, सयाजीराव पाटील, अरुण गायकवाड , संभाजी शिंदे , लक्षमिप्रसाद मोहिते , शिवाजी चापले, बाळासाहेब अकिवाटे, रविंद्र इनामदार , प्रताप थोरात ,कैलास चव्हाण, श्रीकांत शिनगारे, श्वेता ठाकूर , संतोष आळंदकर , किशोर राजे,सुनील वानखेडे , नंदकिशोर बागुल, बद्रीनाथ शिंदे , बळीराम गरड , विलास येंडे, अजय भोयर , मनोज रहांगडाले, प्रमोद सेलोकर , हेमराज बिसेन , धनंजय जिराफे, विजय भड , विनायक ताठोड, चंद्रकांत वाळके ,जनकसिंग राजपूत , प्रशांत पंचभाई, अनंत डोंगरे , अनिल जोशी , मनीष गावंडे , गजानन वैरालकर , सुरेखा माकोडे , गजानन मानकर या आयोजन समिती सदस्यांनी केले आहे.
शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती शिवलिंग पटवे ,शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.वैशाली ठग, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव शनिवार,17 जुलै रोजी दुपारी १ वाजता मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे, अशी माहिती कार्यशाळा संयोजक डॉ. प्रा. रविंद्र भास्कर यांनी दिली आहे .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा