electricity bills: Akola circle: नोव्हेंबर नंतर एकदाही वीजबिल न भरणारे ७२ हजार ग्राहक: ६६ कोटी थकीत; कशी चालणार महावितरण, थकबाकीदारांना महावितरणचा प्रश्न

Akola Circle: 72,000 customers who have not paid their electricity bills since November: 66 crore exhausted;  How will MSEDCL work, MSEDCL's question to the arrears (file image)




अकोला: वीज बिलाच्या प्रत्येक युनिटचे पैसे महावितरणला मिळणे अपेक्षित असतांना अकोला परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ७२ हजार वीज ग्राहकांनी नोव्हेंबर पासून एकदाही वीज भरले नाही. तसेच त्यांच्याकडे थकित बिलापोटी ६६ कोटी रूपये थकले आहे. त्यामुळे महावितरण चालणार कशी असा प्रश्न महावितरण कडून थकबाकीदार ग्राहकांना करण्यात येत आहे. 




कोविडचा पाढा समोर करत वीज बिल भरण्याकडे काही ग्राहक मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याने महावितरणला मोठ्या आर्थीक संकटातून जावे लागत आहे. कोव्हीडची परिस्थिती लक्षात घेता एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वीज ग्राहकांना वीजबिल वसूलीसाठी कोणताही तगादा न लावता अखंडित सेवा देण्यात आली. 




महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी आपल्या थकित वीजबिलाचा भरणा करावा. वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने दरमहा वीजखरेदी , कंत्राटदारांची देणी, कर्जाचे हप्ते , आस्थापना खर्च , दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे. 



नोव्हेंबर नंतर एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांमध्ये अकोला जिल्ह्यातील २४२३३ ग्राहक असून त्यांच्याकडे २४ कोटी २२ लाख थकीत आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ३६८४३ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ३१ कोटी ६१ लाख थकीत आहेत तर, वाशिम जिल्ह्यातील १०८९७ ग्राहकांकडे १० कोटी २२ लाख थकीत आहे. 


टिप्पण्या