Election ZP: BJP News: latest भाजपाचा निर्णय: अकोला जि प 14 व पं स च्या 28 जागा स्वबळावर लढणार ; उमेदवारांची नावे आज घोषित होणार




अकोला:  भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत 14 जागा व पंचायत समितीच्या 28 जागा स्वबळावर लढणार असून या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या अहवाल प्रदेश निवड समितीकडे पाठवण्यात आला असून चार जुलै रोजी संध्याकाळी उमेदवारांच्या अंतिम नावांची घोषणा करून ए बी फॉर्म उमेदवारांना देण्यात येणार आहे. 



केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, तेजराव थोरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, मनीराम टाले, कुसुम भगत, उमेश पवार, माधव मानकर, केशव ताथोड, रमेश खोपरे आदीचा समावेश असलेल्या निवड समितीने उमेदवाररांच्या नावांची शिफारस प्रदेश भाजपाकडे पाठवली आहे. भाजपाकडे भाजप कार्यकर्तासह अन्य पक्षाच्या उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी मागितली आहेत. यासंदर्भात अंतिम निर्णय प्रदेश निवड समिती घेणार असून, अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षामध्ये चर्चा विनिमय सुरू आहे.  यासंदर्भात अंतिम निर्णय होऊन लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.




अन्यथा जनआंदोलन उभारू-सावरकर


अकोला: covid-19 या आजारापासून अनेक  रोग होत असून यापासून डोळ्यांचे आजार मुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे या संदर्भात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने औषधी बाजारपेठ मध्ये उपलब्ध करून दिले नाही, आवश्यक औषधी आम्ही देऊ अशी भीमगर्जना केली परंतु ब्लॅक फंगसमुळे डोळ्यांचा  म्यूकर मायकोसिस आजारासाठी एकुण ६ इंजेक्शन आवश्यक असतांना अकोला सर्वोपचार रूग्णालयात रुग्णांना फक्त २ इंजेक्शन देण्यात येत आहेत. दोन महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये तुटवडा असून  इंजेक्शन देत आहे आणि जे इंजेक्शन देत आहेत त्यामुळे रिअक्शन  मुळे आजार होत आहे त्याचा उपाय योजना करण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नागरीकांचा असंतोष झाल्यावर अकोला मेन हॉस्पिटल सर्वोपचार रुग्णालयात नागरिकांवर दबाव आणण्यासाठी पोलीस  धाक दाखवूनत्यांना धमकी देण्याचा प्रकार आघाडी सरकार सरकारच्या माध्यमातून होत आहे. हा प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. 


काळी बुरशी मुळे अनेकांचे जीव गेले आहेत व मोठ्या प्रमाणात उपचारासाठी अकोल्याहून त्यांना दुसरीकडे औषधी नसल्यामुळे व औषधी च्या साठा चार इलेक्शन मुळे दुसरीकडे हलवण्याचा प्रकार अकोला मेडिकल कॉलेजमध्ये झाला आहे. या प्रकाराची चौकशी करून सरकारने सर्वसामान्य नागरिकांना आधार द्यावा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार केवळ घोषणा  करून औषधी उपलब्ध करून देत नाही नागरिक वनवन फिरत आहे त्यांच्या कोणताही भावना ऐकण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये अधिकारी ऐकत नाही त्यांच्याकडे सुविधा नाही औषधी नाही राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री सर्व उपलब्ध करून देणे अशा भीमगर्जना करतात परंतु नागरिकांना वेठीस धरण्याचा व जीव गमावण्यात प्रकार होत आहे या प्रकरणाचा आमदार रणधीर सावरकर यांनी निषेध व्यक्त केला.




गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे या संदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यावर सुद्धा शासन लक्ष देत नाही आज नागरिकांचा असंतोष झाल्यावर त्यांना धाक दाखवण्यासाठी पोलिसांना  व एस आर पी ला पाचारण करण्यात आला हा कुठला प्रकार आहे असाही सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला आहे. 




एकीकडे विधिमंडळात आवाज विरोधकांनीही उचलू नये. त्यासाठी विधीमंडळाचा दिवस कमी करणे आंदोलना करण्यासाठी वेळ मिळू नये. यासाठी covid-19 नावाचा गजर करायचा ही एकमेव उद्योग आघाडी सरकारला असल्याचाही आरोप आमदार ‌ सावरकर यांनी करून शासनाने जर येत्या चार दिवसात सुधारणा केली नाही तर आपण या संदर्भात जनआंदोलन उभारू याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभाग व राज्य शासनाची राहील व जिल्हा प्रशासनाचे राहील असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे.




उत्तर प्रदेशात भाजपाला विजय


अकोला: उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांच्या नेतृत्वात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेश जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 75 पैकी 65 ठिकाणी तर दोन ठिकाणी भाजप समर्थित उमेदवार विजय झाले आहे यावरून भाजपा जनतेचा विश्वास असल्याचे तसेच नेत्रदीपक विजय प्राप्त केल्याबद्दल राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांची अभिनंदन केले आहे 2022 मध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे पुन्हा सरकार येणार याच्यावर शिक्का मोर्तब त्यांच्या कामावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे अशीही प्रतिक्रिया नामदार धोत्रे यांनी व्यक्त केली.




जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई कराकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्राद्वारे विनंती

 

 

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले व त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर कारखान्यांची यादी पत्रासोबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवली.



 

चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यामुळे राज्यातील कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अशाच रितीने आणखी साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहारावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा संबंधित व्यक्ती पुरावे नष्ट करू शकतात किंवा त्यामध्ये त्रयस्थ हितसंबंध निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेस विलंब लाऊ शकतात.



 

त्यांनी म्हटले आहे की, राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखाने संचालकांच्या नातेवाईकांना कवडीमोल किंमतीला विकले गेले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना २२ ऑगस्ट २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अजित पवार आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय दबावामुळे अजित पवार, जयंत पाटील अशा नेत्यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाबाबत ७२,००० पानांचा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. तथापि, आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यापूर्वीच ईडीने दक्षतेने कारवाई केल्यामुळे दखल घेतली गेली आणि जरंडेश्वरच्या जप्तीसारखी कारवाई केली गेली.




टिप्पण्या