BJP: Akola: भाजपाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही बचाव व विविध मागण्यांसाठी निदर्शने




अकोला:  महा जनादेशाचा अपमान करून सत्तारूढ झालेले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे सरकार पदोपदी लोकशाहीचा अपमान करीत असून शेतकरी शेतमजूर कामगार व्यापारी अठरा पगड जाती बारा बलुतेदार तसेच लोकप्रतिनिधींच्या  अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार निंदनीय असून लोकशाही बचावासाठी भारतीय जनता पक्ष जनतेच्या दरबारी आल्याची प्रतिपादन महानगर भाजपा अध्यक्ष माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केले. 




आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही बचाव व विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन देऊन राष्ट्रपती व राज्यपालांना याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.




भारतीय जनता पार्टीच्या वतीने  लोकशाही बचाव साठी व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाराष्ट्रात सुरू असलेली हुकूमशाही दादागिरी व लोकशाही घातक कारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज निदर्शने दिले. 



मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात सरकारचे अनेक कारनामे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढून वाजे प्रकरण व जनतेच्या प्रश्नासाठी विधिमंडळ गाजवले होते. त्यामुळे आघाडी सरकार घाबरून व जनतेच्या प्रश्नावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाने जनतेच्या दरबारात जाऊन शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असल्याचे अग्रवाल म्हणाले.




अकोला जिल्ह्यातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जूनमध्ये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु जुलै महिना सुरू झाल्यावरही हॉस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली नाही. क्रीडा संस्कृती भवन अर्धवट असून, त्याला निधी दिला नाही. अकोला जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे कृषी महाविद्यालय देवेंद्र फडणवीस सरकारने मंजूर केले होते, ते सुरु केले नाही. उलटपक्षी पशुसंवर्धन राज्यस्तरीय कार्यालय अकोल्यावरून नागपूरला पळवण्याचा महापाप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने केले आहे. 




विमानतळाला पैसे नाही. अधिक विकास कामांना तसेच सिंचन प्रकल्पाला निधी न देण्याचा या सरकारने प्रयत्न केला आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये covid-19 टीमचे काम करणाऱ्या डॉक्टरांना कमी करण्याचा प्रकार सुरू केला आहे एकीकडे तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता उपाय योजना करत असल्याची वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहे. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक कामांमध्ये कात्री लावण्याचा व जनतेला त्रास होईल असा प्रकार सुरू आहे.  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचा आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही खतांची काळाबाजार सुरू आहे. विद्यार्थ्यां कडून फी वसूल केल्यानंतर फी माफीची घोषणा करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे ते परत करणार काय? अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना न्याय देणार काय? यासर्व बाबीवर या आंदोलनात अग्रवाल यांनी प्रकाश टाकण्यात आला.  




केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे, आमदार जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनात महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ऍड. देवाशीष काकड, अश्विनी हातवळणे, वैशाली शेळके, चंदा ठाकूर, बाळ टाले, सतीश ढगे, आशिष पवित्रकार, डॉ किशोर मालोकार, सिद्धार्थ शर्मा, विजय जयपिल्ले, हरीश अलीमचंदानी, ऍड सुभाष सिंग ठाकूर, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी आदींसह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या