- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Big breaking: monsoon session: पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी गदारोळ;भाजपचे 12 आमदार 1 वर्षसाठी निलंबित, संजय कुटे व हरीश पिंपळे यांचा समावेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ झाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले आहे. निलंबनाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपने कामकाजावर बहिष्कार करून वॉक आऊट केले आहे.
तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला. ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बारा आमदार कोण?
डॉ. संजय कुटे (जामोद, जळगाव), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अभिमन्यू पवार (औसा, लातूर), गिरीश महाजन (जामनेर, जळगाव), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व, मुंबई), पराग अळवणी (विलेपार्ले, मुंबई), हरिश पिंपळे (मूर्तिजापूर, अकोला), राम सातपुते (माळशिरस, सोलापूर), जयकुमार रावल (सिंदखेडा, धुळे), योगेश सागर (चारकोप, मुंबई), नारायण कुचे (बदनापूर, जालना), कीर्तिकुमार भांगडिया (चिमूर, चंद्रपूर) यांचा यात समावेश आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा