- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Ashadhi ekadashi 2021: कोविडच्या तिसऱ्या लाटेपासून अकोला पंचक्रोशीतील नागरिकांचे रक्षण कर, बळीराजा सुखावू दे-आमदार शर्मा यांचे श्रीविठ्ठलाकडे साकडे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Shrivithhal Rukhmini Temple, Akola
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: covid-19 तिसऱ्या लाटे पासून अकोला पंचक्रोशीतील नागरिकांचे रक्षण कर व यंदा बळीराजा शेतकरी सुखी संपन्न व्हावा व्यापारी मातृशक्ती युवाशक्ती यांचे आरोग्य चांगले राहावे तसेच युवकांना रोजगार मिळावा व अकोल्याच्या प्रगतीसाठी विशेष निधी देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी, अशी प्रार्थना आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली.
तीनशे अठरा वर्षे प्राचीन जुन्या शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिर येथे अकोला पश्चिम आमदार व धार्मिक कार्यमध्ये सदैव अग्रेसर राहणारे श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गंगादेवी शर्मा शर्मा यांनी विठ्ठल रुक्माई ला आज ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 5 वाजता अभिषेक करून षोडोपचार पूजा करून साकडे घातले.
गेल्या 88 वर्षाच्या शर्मा परिवाराच्या परंपरेनुसार स्व. मांगीलाल शर्मा यांचा वसा गोवर्धन शर्मा यांनी छत्तीस वर्षापासून चालू ठेवला आहे. अकोल्यातील विठ्ठल रुक्माई पंचक्रोशी मध्ये जागृत देवस्थान म्हणून मंदिराला महत्त्व आहे.
गत 88 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह हा संपूर्ण धार्मिक आणि परंपरेने सुरु असून पंढरपूर वारीला जाऊ न शकणारे भक्त मोठ्या संख्येने दर्शनार्थ येतात.
मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे नेतृत्वात सप्ताह मंडळाचे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात शासनाच्या नियमाचे पालन करून सनातन धर्माची पताका कायम ठेवली आहे. मंडळातर्फे आकर्षक रोषणाई सोबत मंदिराची सजावट केली आहे.
श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 101 उपासाचे नैवेद्य छप्पन भोग
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 101 उपासाचे नैवेद्य छप्पन भोग विठ्ठल रुक्माईला अर्पण केले. पहाटेच्या अभिषेक प्रसंगी रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष विलास अनासाने व सौ मनीषा अनासने यांनी आज पहाटे विशेष अभिषेक पूजा अर्चना करून नैवेद्य अर्पण केला.
यावेळी व्यवस्थापक रमेश अलकरी प्रवीण वाणी यशोधन गोडबोले नितीन खोत आनंद उगले सचिन मोदीराज विकास वाणी महेश कडुस्कर श्याम घाटे संजय ठाकूर यश ठाकूर प्रतीक अलकरी राधेश्याम शर्मा राधेश्याम छावछरीया शैलेश राठोड आदित्य अग्रवाल नवल केडिया आशा गोइंका नितीन जोशी गिरीश जोशी ओमप्रकाश खत्री शैलेंद्र खत्री सिद्धार्थ शर्मा किशोर माने पाटील आदी उपस्थित होते.
कोविड नियमांचे पालन करीत भक्तांसाठी बाहेरून दर्शनाची खास व्यवस्था मंडळाने केली आहे. मंदिराला काचेचे दरवाजा लावून भक्तांची सोय करून सर्व भक्तांना विठ्ठल रुक्माईचे दर्शन व 56 भोगचे दर्शन घेता आले.
या कार्यक्रमाला कृष्णा शर्मा अर्चना शर्मा आरती शर्मा अनुप शर्मा यांनी सुद्धा पूजा-अर्चना केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा