Akola Rain update: पावसाचा कहर: अतिवृष्टीत 10 हजार 236 घरांचे नुकसान; पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन

Akola Rain update: Rain havoc: 10 thousand 236 houses damaged due to heavy rains;  Appeal to register up to 29 if there is any objection to Panchnama






अकोला: जिल्ह्यात  21 ते 23 जुलै पर्यंत अतिवृष्टीत झालेल्या घरांच्या नुकसानी बाबत 426 बाधित गावापैकी 299 गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. त्यात नुकसान झालेल्या घरांची संख्या 10 हजार 236 आहे. त्यात अंशत: नुकसान 9965 तर पुर्णत: नुकसान झालेल्या घरांची संख्या 271 आहे. 



दरम्यान झालेल्या पंचनाम्यांबद्दल कुणास आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित तहसिलदार कार्यालयात गुरुवार 29 जुलै पर्यंत नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.




पंचनाम्याची सविस्तर माहिती  


अकोला तालुका बाधीत गावे 183, पंचनामा झालेली गावे 160, नुकसान झालेल्या घरांची संख्या 8620(अंशत: 8400,पुर्णत:220), क्षतिग्रस्त दुकाने 234, 



बार्शीटाकळी तालुका बाधीत गावे 140, पंचनामा झालेली गावे 35, नुकसान झालेल्या घरांची संख्या 197(अंशत: 197,पुर्णत:शुन्य), 



अकोट तालुका बाधीत गावे 31, पंचनामा झालेली गावे 31, नुकसान झालेल्या घरांची संख्या 196 (अंशत:196,पुर्णत: शुन्य), 



तेल्हारा तालुका बाधीत गावे 12, पंचनामा झालेली गावे 12, नुकसान झालेल्या घरांची संख्या 19 (अंशत: 18,पुर्णत:एक), 




बाळापूर तालुका बाधीत गावे 55, पंचनामा झालेली गावे 55, नुकसान झालेल्या घरांची संख्या 1188 (अंशत: 1138, पुर्णत:50) 



पातूर तालुक्यात नुकसान नाही.



मुर्तिजापूर तालुका बाधीत गावे सहा, पंचनामा झालेली गावे सहा, नुकसान झालेल्या घरांची संख्या 16 (अंशत: 16,पुर्णत: शुन्य).

टिप्पण्या