AAP: corruption:cement road: सहा सिमेंट रस्त्याच्या भ्रष्टाचारसाठी 'आप' चे 'तर्पण श्राध्द' आंदोलन





ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शहरातील सहा प्रमुख मार्ग पूर्वी डांबरी होते. मात्र,सन 2018 मध्ये हे मार्ग सिमेंटचे करण्यात आले. परंतु अवघ्या काही दिवसातच सिमेंटचे रस्ते उखडल्याने यातील भ्रष्टाचार समोर आला. नागरिकांनी अनेकदा याबाबत आवाज उठवला. मात्र, सुस्त प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. सरकारचे व स्थानिक प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आज आप पक्षाने मनपा समोर तर्पण श्राद्ध आंदोलन केले.



आंदोलनाची पार्श्वभूमी


शहरातील टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक, टिळक रोड ते मोहता मिल , मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन्स , सरकारी बगीचा ते कलेक्टर ऑफिस आणि अशोक वाटिका असे एकूण 6 रस्ते सन 2018 ला सिमेंटचे बनविले गेले. मात्र, या रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याने लोकांनी व आप पार्टी अकोला यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी थर्ड पार्टी ऑडिट करून तो अहवाल   आयुक्तांना पाठवला होता. त्या अहवालात रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करून अकोला मनपाने आमसभेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा विषय अजूनही अकोला मनपाच्या आमसभेत आला नाही. त्यामुळे कारवाई करण्यासाठी मनपा टाळाटाळ करत आहेत. याविषयी अकोलाकरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज अकोला आम आदमी पक्षाने त्या खराब झालेल्या रस्त्यांचे तर्पण  श्राध्द आंदोलन अकोला मनपा समोरच केले आहे.   



आंदोलनात यांचा सहभाग



यावेळी अमरावती विभागाचे संयोजक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य शेख अन्सार , जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, महानगर संयोजक खंडेराव दाभाडे, सह संयोजक संदीप जोशी, गजानन गणवीर, काझी लायक अली, ठाकुरदास चौधरी, विजय भटकर, दर्पण खंडेलवाल, अनुराग झुणझुणवाला, रामेश्वर बढे ,मो अमीर, मोहन आमले, रविंद्र सावळेकर, हमीद भाई, जावेद खान, दिनेश विश्वकर्मा, सै सलीम, याकूब शहा ,सुधाकर अंभोरे, आदी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या