- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Aadesh Aatote murder case: आदेश आटोटे हत्याकांड:आरोपी दीपकराज डोंगरेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक; 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हत्याकांड मागील गुढ
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे बुधवार ३० जून रोजी ३५ वर्षीय धम्मपाल उर्फ आदेश आटोटे युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे समोर आले. या घटनेत मारेकरी दीपकराज डोंगरे याचा देखील घटनेनंतर काही तासातच मृत्यू झाला. यामुळे मृतक दीपकराज याच्या मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून चार आरोपींना पोलिसांनी आज अटक केली. आजच गुरुवारी चारही आरोपीना न्यायालयात हजर केले असता, पाच जुलै पर्यंत चारही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
आदेश आटोटेची हत्या केल्यानंतर आरोपी दीपकराज पळून जाण्याचा तयारीत होता. मात्र,गावकऱ्यांनी त्याला पकडले. गावकऱ्यांच्या जबर मारहाणीत दीपकराज गंभीर जखमी झाला होता. मात्र,यानंतर काही वेळातच दीपकराज याचा मृत्यू झाला.दीपकराज याच्या मारेकऱ्याचा शोध घेवून पोलीस सांनी या प्रकरणी चार आरोपींना गुरुवारी अटक केली.
हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडले असल्याचा आरोप मृतक धम्मपाल याचा भाऊ विनोद आटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे. तर मृतक आरोपी दिपकराज डोंगरे याच्या मुलीने देखील आटोटे विरुद्ध फिर्याद दिली.ही फिर्याद ३० जून रोजी पोलीसांनी नोंदवून घेतली. मृतक धम्मपाल याने, "तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे", असे म्हटले होते, त्यावर दीपकराज यान, "तु माझ्या मुलीला त्रास का देतो, तुझे लग्न झालेले आहे, तिचा नाद सोडून दे," असे म्हटले असता धम्मपाल याने जमाव करुन माझ्या वडिलांना मारहाण केली. विनोद आटोटे, महादेव आटोटे, इंदुबाई आटोटे यांच्यासह आणखी ८ ते १० जणांनी लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आज संतोष नागोराव आटोटे (४५), प्रभाकर जानराव आटोटे (३०), विजय लाला आटोटे (३३), जितेंद्र शत्रुघ्न आटोटे (३३) या चार आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले. चारही आरोपींची ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
घटनेची हकीकत
धम्मपाल ऊर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता, वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी व भीमगीत गायक म्हणून परिचित होता. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. भाच्याच्या लग्नासाठी २९ जून रोजी आपल्या गावी समशेरपूर येथे आला होता. तर दीपकराज डोंगरे हा शिक्षक नेता होता. यासोबतच जिल्हा परिषदेंतर्गत शाळांचा केंद्रप्रमुख म्हणूनही कार्यरत होता. अकोल्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक सुद्धा होता.
आरोपी दीपकराज डोंगरे (वय ५५, रा. प्रतिकनगर मूर्तिजापूर) हा २९ जूनपासून धम्मपाल याच्या मागावर होता. मात्र तो हाती लागला नसल्याने ३० जून रोजी सकाळीच दीपकराज डोंगरे याने धम्मपाल याला घरीच समशेरपूर येथे गाठून, त्याच्या पोटावर चाकूने व कोयत्याने वार केले. धम्मपाल याचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचा मोठा भाऊ वाद सोडवण्यासाठी गेला असता, दोघांच्या झटापटीत त्याच्या उजव्या हातावर चाकूचा वार लागल्याने तो जखमी झाला. दरम्यान, ही घटना गावकऱ्यांना कळल्यावर, एका जमावाने दीपकराज डोंगरे याच्यावर हल्ला चढविला. जमावाने त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत आरोपी दीपकराज डोंगरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात भरती केले. आरोपी दीपकराज डोंगरे जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुख होता. ॲक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा राज्याचा अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा संचालक आहे.
मृतक धम्मपाल आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता व वंचित आघाडीचा सक्रिय पदाधिकारी असल्याने काही वर्षांपूर्वी दीपकराज डोंगरे व धम्मपाल एकत्र आले होते. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. दरम्यान दीपकराज याला त्याची मुलगी व धम्मपाल यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय आला. यातूनच त्याने धम्मपालचा काटा काढण्याचे षडयंत्र रचल्या गेले. तर प्रेम प्रकरणातून माझ्या भावाची हत्या केल्याचा आरोप मृतकाचा भाऊ विनोद आटोटे केला असून,पोलिसात दिलेल्या तक्रारीत हे नमूद केले आहे.
ग्रामीण पोलीसानी दोन्ही बाजूच्या तक्रारीनुसार तपास चालू केला आहे तपासाअंती अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा