- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Unlock:Akola:अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात: पॉझिटिव्हिटी रेट ७.२४ टक्के तर ४४.६७ टक्के रुग्ण ऑक्सिजन खाटांवर; उद्या पासून अनलॉक प्रक्रिया होणार सुरू…
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
शासनाच्या निकषानुसार जिल्हा तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश उद्यापासून अनलॉक; दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
अकोला: सध्या अकोला जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२४ टक्के असून, ४४.६७ टक्के रुग्ण ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत आहे. शासनाच्या निकषानुसार अकोला जिल्हा तिसऱ्या टप्यात आला आहे. त्यामुळे उद्या सोमवार ७ जून पासून जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश पारीत केला.
कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत जिल्हा फार प्रभावित झाला आहे. एप्रिल, मे महिन्यात कोरोनाने अकोल्यात थैमान घातले होते. मात्र, मे महिन्याच्या अखेर रुग्णसंख्या वाढीचा दर झपाट्याने खाली आला. जून च्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल अक्टिव्ह रुग्णांची संख्या कमालीची घटल्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन खाटा रिक्त झाल्या आहेत.
विकेंडला बाजारपेठ बंद
शासनाने पाच टप्प्यात अनलॉक नियोजन केले. त्यासाठी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन खाटांचे निकष लावण्यात आला आहे. या निकषानुसार अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे उद्या सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉकला सुरुवात होत आहे. यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबतच दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. तर वीकेंडला औषधांची दुकाने वगळता उर्वरित बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.
जमावबंदीचा आदेश
जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश देण्यात आला असून सायंकाळी ५ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी ही घोषीत करण्यात आली आहे.
काय राहील सुरू
अत्यावशक असलेली व नसलेली सर्व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.
रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. त्यानंतर घरपोच सेवा सुरु राहील.
जीम, सलून, ब्यूटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहील. ए.सी. बंद ठेवून चालू राहील.
सार्वजनिक मैदाने, आऊटडोर गेम्ससाठी दरदिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.
खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ वाजतापर्यंत चालू राहतील.
अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.
सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत, तर लग्नसमारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील,
सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमी प्रमाणे सुरू राहतील.
हे बंद राहील
मॉल थिएटर, नाट्यगृह बंद राहतील. विकेंडला सर्व बिगर अत्यावश्यक दुकाने बंद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा