OBC Reservation:political:BJP: तीन तास रस्ता बंद:अकोल्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे चक्काजाम आंदोलन; आमदार सावरकर यांच्यासह तीन हजार कार्यकर्त्याना अटक




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कॉंग्रेस, शिवसेना, राष्‍ट्रवादी सरकारच्‍या नाकर्ते व हलगर्जीपणामुळे ओबीसी समाजाला न्‍याय न देण्‍याच्‍या भुमिकेची आस्‍था नसल्‍यामुळे  रद्द ठरवलेले आहे. या विरोधात ओबीसी व मराठा समाज शेतकरी १८ पगड जाती १२ बलुतेदार व सर्व सामान्‍य नागरीकांना न्‍याय मिळवून देण्‍यापर्यंत भाजपाचा लढा सुरू राहणार हे आंदोलन प्रतिकात्‍मक असून यानंतर महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात तिव्र आंदोलन करण्‍याची घोषणा जिल्‍हा भाजपा अध्‍यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली. स्‍थानिक शिवर नॅशनल हायवे नं. ६ चौफुलीवर अकोला महानगर जिल्‍हा व अकोला तालुका भाजपा तसेच ओबीसी आघाडी तर्फे आयोजीत रस्‍ता रोको आंदोलनात ते बोलत होते.



आंदोलनात यांचा होता सहभाग


यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महानगर अध्‍यक्ष विजय अग्रवाल, रवि गावंडे, जयंत मसने महापौर अर्चना मसने, श्रावण इंगळे, अनिल शिंदे, पवन बुटे, राजेश बेले, रावसाहेब कांबे, अंबादास उमाळे, गणेश पाटसुल, किशोर पाटील, राजेंद्र गिरी, गितांजली शेगोकार, वैशाली शेळके, सुमनताई गावंडे, माधुरी बडोणे, संजय बडोणे, चंदा शर्मा, संतोष पांडे, निलेश निनोरे, अमोल गोगे, ऍड. देवाशिष काकड, माधव मानकर, संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, डॉ. विनोद बोर्डे, संजय गोडफोडे, अनिल गावंडे, गणेश अंधारे, योगीता पावसाळे, गणेश पावसाळे, सिध्‍दार्थ शर्मा, अनिल मुरूमकार, शारदा ढोरे, वैकुंठ ढोरे, रश्‍मी अवचार, प्रशांत अवचार, संदिप गावंडे, अनुराधा नावकार, जयश्री दुबे, तुषार भिरड, रश्‍मी कायंदे, चंदा ठाकुर, रंजना विंचनकर, श्‍याम विंचनकर, विजय इंगळे, जान्‍हवी डोंगरे, जयकृष्‍ण ठोकळ, प्रशांत पांडे, डॉ.शंकरराव वाकोडे, हरिष आलमचंदानी, अनिल गरड, हरिभाऊ काळे, गिरीराज तिवारी, वसंत संदलकर, सचिन मुदीराज, मोहन पारधी, अक्षय जोशी, बबलु झवर, मनिष बुंदेले, संग्राम इंगळे, आकाश ठाकरे, निलेश ठेवा, उमेश गुजर, अभिजीत बांगर, अभिजीत कडू, राजु शर्मा, जसमित सिंग ओबेरॉय, मंगला सोनोने, आरती घोगलीया, अर्चना चौधरी, राहुल देशमुख, शारदा खेडकर, रणजीत खेडकर, पंकज वाडेवाले, भरत काळमेघ, गोविंद गोयनका, दिलीप मिश्रा,  सचिन मुदीराज, रमेश अलकरी, उमा साहू, साधना येवले, शकुंतला जाधव, गोपाल मुळे, नितीन गवळी, रूपाली जगताप, विशाल इंगळे, कन्‍हैया आहुजा, सतिष ढगे, बबलु सावंत, टोनी जयराज, बाळ टाले  सह २००० च्‍या वर कार्यकर्ते सहभागी झाले होते. 




जिल्ह्यात 15 ठिकाणी रस्तारोको


अकोला जिल्‍ह्यात १५ ठिकाणी रस्‍ता रोको आंदोलनात हजारो कार्यकर्ते ओबीसी बांधवांच्‍या न्‍यायीक हक्‍कासाठी रस्‍तयावर आले आहेत. यह तो झॉंकी है, असे सांगुन शिवसेना प्रणित सरकारला आमदार सावरकर यांनी इशारा दिला. १८ पगड जाती, १२ बलुतेदारांच्‍या प्रश्‍नांसाठी महाराष्‍ट्रात आरक्षण देणारे छत्रपती शाहु महाराजांच्‍या जयंती दिनापासून या सरकारला निर्वाणीचा इशारा भाजपाने दिला आहे. आज अकोट, तेल्‍हारा, निंबा फाटा, पातुर, मुर्तिजापूर, बाळापुर, बार्शिटाकळी, वाडेगांव या भागात आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, तेजराव थोरात, बाळासाहेब आपोतीकर, अशोक गावंडे, गजानन उंबरकार, महेंद्र गोयनका, कनक कोटक, राजेश रावणकर, हरिनारायण माकोडे, जयश्री पुंडकर, मोनिकाताई गावंडे, मोनिकाताई वाघ, नयना मनतकार, कुसूम भगत, उमेश पवार, डॉ. श्रीकृष्‍ण तिडके, श्रीकृष्‍ण मोरखडे, प्रविण डिक्‍कर, मंगेश ताडे, सचिन देशमुख, मनिराम टाले, रामदास तायडे, प्रभाकर मानकर, राजेश नागमते, रमन जैन, रमेशआप्‍पा खोबरे, केशव ताथोड, अभिजीत गहलोत, महेंद्र पेजावर, अमोल साबळे, किशोर गुजराथी, मनोहर राहणे, विलास पोटे, रतन गीरी, प्रकाश श्रीमाळी, रामदास लांडे, राजु काकड, हिरासिंग राठोड, भुषण कोकाटे, अमित कावरे, पुंजाजी मानकर, मधुकर पाटकर, दत्‍तु पाटील गावंडे, डॉ. संजय शर्मा, पवन वर्मा, डॉ. मनमोहन व्‍यास, संतोष झुनझुनवाला, संदिप उगले, मुक्‍ता टाले, गोपाल पेठे आदिंच्‍या नेतृत्‍वात जिल्‍ह्याभरात आंदोलन झाले. 



तीन हजारच्यावर कार्यकर्त्याना अटक

या आंदोलनाला दाबण्‍याचा प्रकार शिवसेना, कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी पक्षाच्‍या वतीने करण्‍यात येवून भाजपा पदाधिका-यांना नोटीस देण्‍यात आल्‍या. आंदोलनात तीन हजाराच्‍या वर कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली. पोलीस यंत्रणेजवळ व्‍यवस्‍था नसल्‍यामुळे निवडक पदाधिका-यांना ४ गाड्यांमध्‍ये अटक करण्‍यात आली व इतर कार्यकर्त्‍यांना अटक व सुटका कलम ६७ व ६९ अंतर्गत करण्‍यात आली. या आंदोलनात विजय अग्रवाल आ. गोवर्धन शर्मा, रवि गावंडे, जयंत मसने, अंबादास उमाळे, अनिल शिंदे, श्रावण इंगळे, गणेश पाटसुल, राजेश बेले यांनी संबोधीत केले, कार्यक्रमाचे संचालन गिरीष जोशी यांनी केले. या आंदोलनामुळे तीन तास वाहतुक बंद होती.


टिप्पण्या