Farmer: Technology: Freedom: किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह: गनिमीकावा करीत प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड! तीन शेतकरी पोलिसांच्या ताब्यात


   विशेष वृत्त: नीलिमा शिंगणे-जगड





असे झाले आंदोलन


*किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह संपन्न


*निलेश नेमाडे, तालुका प्रमुख दादाभाऊ टोहोरे, दिलीप वानखडे यांना सकाळी पोलिसांनी घेतले ताब्यात


*शेतकरी संघटना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत कौठकर (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) यांच्या सोबत मोहन खिरोडकर, संजय ढोकणे, जाफर खान, आकाश देऊळकार विलास ताथोड यांना शेतात जाण्यास अडवणूक करून शेताच्या बांधावर बंदीस्त केले.


*तर शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललित पाटील बाहाळे, शेतकरी दिनेश देऊळकार आंदोलन जाहीर करणारे  सतीश देशमुख, अजित कळसकर, गोपाल निमकर्डे, दिनेश गिरहे यांनी अडगाव खुर्द या शेतात जाऊन किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह करून ht bt बियाण्यांची लागवड केली असल्याचे सत्याग्रहीनी सांगितले.


*ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


*आंदोलन जाहीर करणारे शेतकरी दिनेश देऊळकार. शेताचे गाव अडगाव खुर्द, शेताचे नाव कासाईवाडा.



*शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांनी केला गनिमीकावा पद्धतीचा वापर. प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड!




अकोला: अडगाव शेतकरी संघटनेच्या वतीने अडगाव खुर्द येथे कसाईवाडा शिवारात किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह अंतर्गत गुरुवारी पोलीस व कृषी विभागाचा विरोध झुगारत प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केली. मात्र, पोलिसांनी वेळीच तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. 




पोलिसांचा कडक बंदोबस्त लावल्या गेल्याने एचटीबीटी व इतर बियाणे लागवड संबंधित माहिती व प्रसारण केंद्राचे उदघाटन कार्यक्रमास चार तास उशीर झाला.



राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललीत बहाळे यांचे हस्ते व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांचे प्रमुख उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललीत बहाळे यांचे नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन घोषणा देत, उदघाटन स्थळी प्रवेश केला. मात्र पोलिसांनी शेतकरी संघटनेचे फलक जप्त केले. यावेळी पोलीस व कृषी विभागाचा विरोध झुगारून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक एचटीबीटी बियाण्यांची पेरणी केली.



एचटीबीटी कपाशी बियाणांची लागवड करण्यास महाराष्ट्रात शासन बंदी


एचटीबीटी कपाशी बियाणांची लागवड करण्यास महाराष्ट्रात शासन बंदी आहे. मात्र, एचटीबीटी कपाशीचे बियाणे हे उत्पादन वाढविणारे असून, यामुळे शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी गत काही वर्षापासून शेतकरी संघटनेच्या वतीने या बियाणांच्या समर्थनार्थ किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह करण्यात येत आहे. एचटीबीटी बियाणांचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्यासोबतच त्यांच्या शेतामध्ये या प्रतिबंधित बियाणांची लागवड करण्यात येते. 



सत्याग्रही


शेतकरी संघटनेचे ललीत बहाळे, लक्ष्मीकांत कौठकर, सतीश देशमुख, विलास ताथोड, निलेश नेमाडे, दिनेश देऊळकार, दादाभाऊ टोहरे, दिलीप वानखडे, मोहन खिरोडकर, संजय ढोकणे, जाफर खान, आकाश देउळकार, अजित कळसकर, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे या सत्याग्रहीना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सुटका केली. 




घटनास्थळावर सकाळपासून तालुका कृषी अधिकारी सुशांत शिदे, पं. स. कृषी अधिकारी विठ्ठल थुल, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, हिवरखेड ठाणेदार धीरज चव्हाण, पोलीस पाटील हितेश हागे तैनात होते.



टिप्पण्या