Election 2021: Akola: ZP PC: पोटनिवडणुकीचे वारे; पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही

                                     file image


अकोला : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मंगळवारी (29 जून) उमेदवारी अर्ज सादर करण्याचा पहिला दिवस होता. मात्र, पहिल्या दिवशी एकाही इच्छुक उमेदवाराकडून नामनिर्देशन (उमेदवारी) अर्ज सादर झालेला नाही. 


न्यायालय निर्णयाची प्रतिक्षा!


3 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट झाला होता. आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला. डिसेंबर 2018 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात असल्याने शासनाने पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून 2020 मध्ये निवडणुका झाल्या. मात्र 4 मार्च रोजी न्यायालयाने अंतिम निर्णय देत ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या होत्या. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यानंतर या निवडणूक घेतल्या जात आहेत. मात्र, कोरोना परिस्थिती पाहता निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, याकरिता दाखल याचिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


5 जुलैपर्यंत भरता येणार अर्ज


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील पोटनिवडणुकीसाठी 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. 



अश्या आहेत पुढील तारखा 


5 जुलै नंतर उमेदवारी अर्जाची छाननी व त्यावर निर्णय देण्यात येईल आणि वैध उमेदवारांची यादी प्रकाशित हाेईल.


काही आक्षेप असल्यास 09 जुलै रोजी जिल्हा न्यायाधिशांकडे अपील करता येईल


12 जुलै पर्यंत त्यावर निकाल होईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेता येईल व चिन्हाचे वितरण हाेईल.


14 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दुपारी 3 पर्यंत मागे घेता येईल


19 जुलै रोजी मतदान होणार


20 जुलै रोजी मतमोजणी होईल


 23 जुलै रोजी विजयी सदस्यांची नावे घोषित होणार


या गावात पोटनिवडणूक


अकोला जिल्हा परिषद : दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा, शिर्ला सर्कल.


अकोला पंचायत समिती : हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपूरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग 1, देगाव, वाडेगाव भाग 2, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानपूर, आलेगाव.

टिप्पण्या