Education:India: केंद्रीय मंत्री संजय धोत्रे जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार


 





नीलिमा शिंगणे-जगड 

अकोला: केंद्रीय शिक्षण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री तथा अकोल्याचे खासदार  संजय धोत्रे  22 जून 2021 रोजी होणाऱ्या जी-20 गटसदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही बाब अकोल्यासाठी भूषणावह आहे.


संजय धोत्रे हे त्याच दिवशी जी-20 गटसदस्य देशांच्या शिक्षण तसेच श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार आहेत.


या दोन्ही बैठका संयुक्तरीत्या इटलीच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या आहेत भारत या बैठकीत दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभागी होणार असल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.




अकोलासाठी भूषणावह


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू खासदार व सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे शेतकरी नेते संजय धोत्रे यांच्याकडे ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली असून, केंद्रीय मंत्री रमेश निशंक पोखरियाल व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मार्गदर्शनात जागतिक स्तरावर जी२० समूह राष्ट्रांची शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 20 जून मंगळवार रोजी होणाऱ्या बैठकीत शिक्षण कामगार रोजगार या विषयावर जागतिक स्तरातील मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत इटलीच्या अध्यक्षतेखाली ब्लेंड मोड मध्ये होत असून, भारत व्हर्च्युअल मोडमध्ये सहभागी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे अभ्यासू शिक्षित व वेगळ्या वेगळ्या विषयावर त्यांचा अभ्यासपूर्ण माहिती असल्यामुळे त्यांना भारतीय सरकारचे प्रतिनिधी म्हणून विचार व्यक्त करण्याची संधी दिली आहे. 



ही बाब अकोला लोकसभा मतदार संघाच्या मतदारांचा गौरव व सन्मान असून वेगवेगळ्या विषयावर प्रखरपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारच्या वतीने 130 कोटी जनतेचे सेवक म्हणून संजय धोत्रे हे या बैठकीत सहभाग घेणार आहेत.




टिप्पण्या