Covid impact:education:BJS कोविडमुळे अनाथ झालेल्या सातशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी बिजेएसने स्वीकारली




अकोला: कोविडमुळे अनाथ झालेल्या 700 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्विकारली आहे. बीजेएसच्या वाघोली ( पुणे ) येथील शैक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेत या विद्यार्थ्यांना  5 ते 12 पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.



बिजेएस शैक्षणिक संकुलात वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळाचे मैदान, दवाखाना,  मानसोपचार तज्ञांचा सल्ला अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याच शैक्षणिक संकुलात लातूर येथील 1200 भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील 1100 आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे 700 विद्यार्थी अशा एकूण  3000 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन गेल्या 30 वर्षांत भारतीय जैन संघटनेने केले आहे. 




कोविडमुळे अनाथ झालेल्या अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची यादी मागण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बुधवारी भारतीय जैन संघटनेच्या वतीने  पत्र देण्यात आले. यावेळी  भारतीय जैन संघटनेचे प्रा. सुभाष गादिया, समीप इंदाने, विजय चौधरी, दीपक हलोदिया, प्रशांत सैतवाल उपस्थित होते.

टिप्पण्या