- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: जीएन इंटरप्राईजेसचे संचालक मोहम्मद हनीफ मो इब्राहिम यांना दिलेले धनादेश अनादरीत झाल्या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यु पी हिंगमिरे यांनी आरोपी मोहम्मद फिरोज मोहम्मद शिराज कोठी (रा. उमरखेड जि. यवतमाळ) याला दोन्ही खटल्यात दोषी ठरवून प्रत्येकी सहा सहा महिन्याची शिक्षा व तीन लाख सत्तर हजाराचा दंड ठोठावला.
या प्रकरणाची माहिती अशी की, मोहम्मद हनीफ यांचे g.m.d. मार्केटमध्ये जी एन एंटरप्राइजेस असून ते मिठाचे ठोक विक्रेता आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील मोहम्मद फिरोज मोहम्मद सिराज कोठी यांनी जी एन एंटरप्राइजेस मधून 2015 मध्ये मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी केले होते. या मोबदल्यात मोहम्मद फिरोज यांनी स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा उमरखेड येथे वटणारे दोन लाख पन्नास हजार रुपयाचा तसेच पन्नास हजाराचा असे दोन धनादेश दिले होते. आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे दोन्ही धनादेश परत आले. ही बाब जी एन एंटरप्राइजेसचे संचालक मोहम्मद हनीफ मोहम्मद इब्राहिम यांनी आरोपी मोहम्मद फिरोजच्या लक्षात आणून दिली होती. यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोहम्मद फिरोज विरुद्ध अकोला न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या खटल्याचा निकाल जाहीर करताना न्यायालयाने आरोपी मोहम्मद फिरोज मोहम्मद शिराज कोठी याला दोन्ही खटल्यात दोषी ठरवले व तीन लाख रुपये दंड व सहा महिन्याची सक्तमजुरी, तसेच दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये 70 हजार रुपये दंड आणि सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. तक्रारदार जी एन एंटरप्राइजेस च्या वतीने ॲड. पियुष सांगाणी यांनी युक्तिवाद केला. आरोपींनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना दोन्ही गुन्ह्यांमध्ये चार महिन्याची पुन्हा शिक्षा भोगावी लागेल असेही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा