Anti-corruption: दारू विक्रेत्यास लाच मागणे पडले महागात; रायटर रंगेहाथ अडकला एसीबीच्या जाळ्यात

                                    File image



अकोला : रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत लाच मागितल्या प्रकरणी ठाणेदार यांचा रायटर एसीबीच्या जाळ्यात अडकला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एका दारू विक्रेत्याला पैशाची मागणी केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.




रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका दारू विक्रेत्यास रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांचे रायटर असलेले गणेश पाटील याने लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्यास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेत पाटील विरुद्ध तक्रार नोंदविली.




लाचेच्या मागणीची पडताळणी करून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रामदासपेठ पोलिस स्टेशन ठाणेदारचे रायटर यास ताब्यात घेतले. या लाचेची मागणी रक्कम ही 27,000/- रुपये असून ती रक्कम स्वीकारताना रायटर (पोलीस कर्मचारी) गणेश पाटील यांना दुपारच्या सुमारास रंगेहात अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करीत आहे.

टिप्पण्या