Anti Corruption: पाचशे रुपयाची लाच मागणारा ट्रॅफिक पोलीस अडकला अँटी करप्शन ब्यूरोच्या जाळ्यात; तर आरोग्य विभागातील लिपिकास रंगेहाथ पकडले






नागपूर : ऑटो रिक्षा चालकाला पाचशे रूपयाची लाच मागणे एका वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला चांगलेच भोवले आहे. लाच मागणाऱ्या या ट्रॅफिक पोलिसाला अँटी करप्शन ब्युरोने अटक केली आहे. बिपीन शंकरराव महाजन (वय 32 वर्षे) असे या लाचखोर पोलीस शिपायाचे नाव असून, तो सोनेगाव विभाग येथे कार्यरत आहे. तर दुसऱ्या घटनेत आरोग्य विभागातील राजेंद्र शंकरराव गजभिये (वय ५५) या लाचखोर वरिष्ठ लिपिकास रंगहाथ पकडले. अँटी करप्शन ब्युरोने मंगळवारी या दोन धाडसी कामगिरी केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.




सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार  इंदिरा माता नगर, हिंगणा रोड नागपूर येथील रहीवाशी असून व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक आहेत. तक्रारदार हे 10 मे 2021 रोजी शंकर नगर चौकातून यु-टर्न करून सीताबर्डी कडे जात असताना समोरच्या दिशेने येत असलेल्या एका रुग्णवाहिकेने तक्रारदाराच्या ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये तक्रारदाराच्या ऑटोचे  खुप नुकसान झाले होते. परंतू, रुग्णवाहिका चालक व तक्रारदार यांच्यात आपसी समझोता झाल्याने रुग्णवाहिका चालक त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर तेथे कर्तव्यवर असणारे वाहतूक पोलीस बिपीन महाजन तक्रारदारच्या जवळ येवून म्हणाले की, "तुझ्या ऑटोचे 2,000 (दोन हजार) रूपये चालान करतो आणि कारवाई करून ट्राफिक चेंबरला लावतो". तक्रारदार यांच्याकडे लायसन्स नसल्याने त्यांना ऑनलाईन रू. 200/- चे अनपेड चालान दिले, ते तक्रारदारास ट्राफिक आफीसला भरण्यास सांगितले. याच दरम्यान पोलीस शिपाई  महाजन याने तक्रारदारला 500/- रू आणुन दे नाही तर तुझा ऑटो जिथे दिसेल तेथुन ट्राफिक चेंबरला लावुन रू. 2,000/- चालानची कार्यवाही तुझ्यावर करील, असे म्हणुन 500/- रू लाचेची मागणी केली. 



तक्रारदार यांना महाजन यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील कार्यालय गाठून  महाजन याचेविरूध्द तक्रार नोंदविली.



लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील पोलीस उपअधिक्षक नरेश पार्वे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून सापळा रचला. त्यामध्ये पडताळणी दरम्यान पोलीस शिपाई बिपीन महाजन यांनी तक्रारदार ऑटोवर कारवाई न करण्यासाठी 500/- रू लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने त्याला अँन्टी करप्शन ब्युरो नागपूरच्या पथकाने मंगळवार 8 जून 2021 रोजी ताब्यात घेतले. त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे भ्रष्टाचार प्रतिंबधक कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून ताब्यात घेतले.


ही कामगिरी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर (लाप्रवि नागपूर परिक्षेत्र),     अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक  नरेश पार्वे (लाप्रवि. नागपूर) तसेच लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सचिन किन्हेकर, शारीक शेख (सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर) यांनी केली.



तर लिपिकास रंगेहाथ पकडले

                      प्रतिकात्मक संग्रहित चित्र



तर दुसऱ्या घटनेत आरोग्य विभागातील लिपिकास मंगळवारी अँटी करप्शन ब्युरो ने रंगेहाथ पकडले. 


या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, महापालिका येथे सफाई कर्मचारी असलेले पीडित ३१ मार्चला निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांची पत्नी पतीचे निवृत्ती वेतन आणि इतर हक्काचे लाभ मिळावे म्हणून धरमपेठ झोनचे आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (वय ५५) यांच्याकडे चकरा मारू लागली. निवृत्ती वेतनासोबतच शिल्लक सुट्यांचे पैसे वाढवून देण्याची बतावणी करून गजभिये याने या महिलेला ३ जून रोजी १० हजाराची मागणी केली. 


या महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरुणाला खिळून आहे. तर, ही महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. १० हजाराची रक्कम खूपच जास्त असल्याने या महिलेने थेट एसीबी गाठले.  तिच्या तक्रारीवरून एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी उपअधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात नायक रविकांत डहाट अनमोल मनघरे, आचल हरगुळे, अस्मिता मेश्राम आणि प्रिया नेवरे यांनी दुपारी ४ वाजता गजभियेला लाचेचे १० हजार रुपये स्वीकारताच रंगेहाथ पकडले.





या कारवाईमुळे ऑटोचालक व महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लाच मागणारा पोलीस विभागातील असो, आरोग्य विभाग की अन्य कोणत्याही क्षेत्रातील असो, नागरिकांनी समोर येवून, या विरुद्ध आवाज उठविणे गरजेचे आहे. तरच भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य होईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 


टिप्पण्या