- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola district: Coronavirus free दिलासादायक: कोरोनामुक्तीकडे वाटचाल: 747 गावे झाली कोरोना मुक्त; आज एकूण पॉझिटिव्ह केवळ 3 रुग्ण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: कोरोना महामारीच्या प्रकोपाने भेडसावलेला अकोला जिल्हा आता अत्यंत सावधानतेने कोरोनामुक्तीकडे पाऊल टाकत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असतांना जिल्ह्यातील 844 पैकी 747 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ‘गाव करी ते राव न करी’, या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी एकजुटीने कोरोना विरुद्ध आपपाल्या गावात मुकाबला केला आहे. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे आजचे ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचा मोकळा श्वास घेतला जातोय.
याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात 535 ग्रामपंचायतीतील 844 गावांपैकी 793 गावे कोरोना विषाणूने बाधीत होते. तर 51 गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावच दिसून आला नाही.
कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून सद्यास्थितीत 747 गावे कोरोना मुक्त झाली आहेत. या गावांमध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसून सर्व रुग्ण बरे होऊन गाव कोरोना मुक्त झाले आहे. सद्यस्थितीत 46 गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून या गावांमध्ये 112 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात 31 प्राथमिक आरोग्य केंद्र, 178 उपप्राथमिक आरोग्य केंद्र, पाच ग्रामीण रुग्णालय व मुर्तिजापूर येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार केला जातो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन आवश्यक आहे. सोबतच प्रशासनामार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 47 लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे साठवण व वितरण स्थानिक स्तरावर केले जातात. आजपर्यंत (दि.28जून) जिल्ह्यामध्ये तीन लक्ष 88 हजार 360 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी तीन लक्ष 05 हजार 276 व्यक्तींना (21 टक्के) लसीकरणाचा पहिला डोस दिला गेला. तर 83 हजार 84 व्यक्तींना (0.6 टक्के) लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. 45 वर्षावरील नागरिकांना द्यावयाचा लसीकरणाचा पहिला डोस दोन लक्ष 20 हजार 906 व्यक्तींना (30 टक्के) देण्यात आला तर 62 हजार 398 व्यक्तींना (10.3 टक्के) दुसरा डोस देण्यात आला. तसेच 18 ते 44 वयोगटातील 59 हजार 543 नागरिकांना (सात टक्के) लसीकरणाचा पहिला डोस तर सहा हजार 537 व्यक्तींना (0.7 टक्के) दुसरा डोस देण्यात आले आहे अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी दिली.
तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली असतांना गावकऱ्यांनी एकजूट दाखवून केलेली प्रत्येक गावाची कोरोनामुक्ती ही शहरी लोकांसाठीही अनुकरणीय ठरावी.
आज केवळ 3 पॉझिटीव्ह; 13 डिस्चार्ज
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 122 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 120 अहवाल निगेटीव्ह तर दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57571 (43056+14338+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह-तीन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 291844 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 288365 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3082 नमुने होते. आजपर्यंत एकूण 291808 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 248752 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज दिवसभरात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून ते तेल्हारा तालुक्यातील आहे. दरम्यान काल (दि.27) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
13 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, असे एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
412 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57571(43056+14338+177) आहे. त्यात 1126 मृत झाले आहेत. तर 56033 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 412 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा