- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola crime:murder: room mate: मित्राने केली मित्राची हत्या;नीट परीक्षेच्या तयारीसाठी बुलडाणाहुन दोघे आले होते अकोल्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने आपल्या रूममेटची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रतीक लवंगे असे मृतकाचे नाव असून आरोपी व मृतक दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हील लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुले नीट परीक्षेच्या तयारीकरिता राहायला आले होते. हे दोघेही नवयुवक जीवलग मित्र असल्याने एकाच खोलीत भाड्याने राहत होते. 17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून आपसात वाद झाला आणि या वादातच प्रतीक लवंगे या युवकाची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मृतक आणि आरोपी दोघेही शिक्षणात हुशार. अभ्यास सुरू असतानाच यातील एका टॉपिक वरून दोघात वाद झाला असल्याचे कळते. हा वाद एवढा शिगेला पोहचला की हत्या घडून आली. मृतकाला रुग्णवाहिकेतून नेत असताना आरोपी देखील सोबत होता. पोलिसांचा संशय बळावल्याने अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेवून चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा