Akola: bachhu kadu:prahar अन बच्चू भाऊ कडू युसूफ खां पठाण बनतात तेंव्हा… प्रशासकीय यंत्रणा धास्तावली; गुटखा विक्रेते,स्वस्त धान्य दुकानदारांची उडाली झोप




अकोला: आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत नेहमी हटके आंदोलन करणारे बच्चूभाऊ कडू यांनी आज चक्क वेशांतर करुन प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली. तसेच स्वस्त धान्य दुकानदार आणि जिल्ह्यात गुटखा विक्री सुरू आहे का,हे देखील त्यांनी तपासले असता, यात अनेकांचे पितळ उघडे पडले. यामुळे पोलीस यंत्रणाने देखील धसका घेतला आहे. 





अकोल्याचे पालकमंत्री असलेले  बच्चू कडू यांनी आज वेषांतर करत  जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणाचा आढावा घेत असल्याची चर्चा सकाळ पासून सुरु होती. मात्र,  कुठल्या वेशात ते फिरत आहे याची कुणालाच माहिती नव्हती.  परंतु  याची  चुणूक लागल्याने काही विभागांना लागल्याने त्यांनी कमालीची सजगता बाळगली.


बच्चू भाऊ बनले युसूफ खां पठाण



अकोला महापालिकेत आज प्रहार संघटनेच्या वतीने घरकुलांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनाच्या वेळी आयुक्तांना भेटायचे आहे असे म्हणत आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला. पालकमंत्र्यांनी मुस्लिम व्यक्तीचे वेषांतर करत तोंडाला मास्क, फडके गुंडाळून आयुक्तांच्या स्विय सहायकाला आयुक्तांच्या भेटीसाठी विनंती केली. पण, आयुक्तांच्या स्विय सहायकाने नेहमी प्रमाणे त्यांना आयुक्त आत नाहीत दूपारी चार ते पाच भेटा असे पठडीतील सरकारी उत्तर दिले. आंदोलन स्थळी बच्चू कडू यांनी काही वेळ थांबले. 



बच्चू भाऊंनी मागितला गुटखा



पातूर येथील कलश व एसबी या दोन पानसेंटर येथे गुटखा मागितला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा मागितला. तो दोन्ही पान सेंटर चालकांनी तुम्हाला जितका पाहिजे तितका देऊ, असे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांना दिले. यातच दोन्ही पान सेंटर वाल्यांचे पितळ उघडे पडले.



पालकमंत्री  कडू यांनी यानंतर आपला मोर्चा तहसील कार्यालयात वळविला. तिथे बच्चू भाऊ युसुफ खां पठाण नाव धारण करुन रेशनकार्ड तयार करण्यासाठी गेले. तिथे त्यांना नियमा प्रमाणे कागदपत्रे आणा तसे तयार होत नाही, असे सांगत शासकीय यंत्रणेने टाळले.



त्यानंतर पालकमंत्र्यांनी एका स्वस्त धान्य (रेशन) दूकानाला भेट देत तांदूळ पाहिजे असे म्हटले. पण, राशन दूकानदाराने आता ऑनलाईन व्यवस्था आहे, अशा प्रकारे कुठलाही तांदूळ देऊ शकत नाही असे म्हणत नकार दिला. 



पालकमंत्र्यानी आज केलेल्या वेषांतराने शासकीय यंत्रणा चांगलीच धास्तावलेली आहे. शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने बच्चू कडू यांनी वेषांतर करत  आढावा घेतला आहे. पालकमंत्री कडू यांनी केलेल्या या वेषांतराची आज संपुर्ण जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा होती.  पातुर येथील गुटखा पान सेन्टरवर भेट दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या वेषांतर मुळे प्रशासकीय यंत्रणा पुरती धास्तावली आहे.  


अशा हटके style मुळेच बच्चू कडू हे युवा वर्गात लोकप्रिय आहेत.


टिप्पण्या

  1. अकोला शहरात किती मोठ्या प्रमाणात गुटका विक्री सुरु आहे . पोलिस चौकीचे बाजुला आहेत काहि होवु शकत नाहि .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा