Third Wave Possibility: तिसरी लाट संभावना: अकोला: लहान मुलांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष सुरू करावा-आमदार सावरकर

Third Wave Possibility: Akola: Special Room in Super Specialty Hospital for Children - MLA Savarkar







*शरीरातील विविध अवयव डोळे, कान आदींवर दुष्परिणाम होण्याची शक्यता; तज्ज्ञांची टीम नियुक्त करावी





अकोला :सतत बारा महिन्यापेक्षा अधिक अकोला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व भाजपा लोकप्रतिनिधी करत होते. या संदर्भात covid-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात आदेश निर्देशीत केले आहे. परंतु पूर्ण क्षमते  हॉस्पिटल सुरू करण्यात यावे तसेच तिसरी लाटची संभावना लक्षात घेता लहान मुलांवर तसेच शरीरातील विविध अवयव डोळे कान यांच्यावर वाढता  दुष्परिणाम परिणाम होत आहेत यासाठी विशेष कक्ष चा समावेश यामध्ये करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित देशमुख व आरोग्य संचालक तात्यासाहेब लहाने यांच्याकडे केली आहे.  




सध्या मनुष्यबळाची  कमतरता लक्षात घेता या बाबीकडे विशेष लक्ष देऊन हे हॉस्पिटल युद्धपातळीवर सुरू करण्यात यावे व दिवसेदिवस अकोला जिल्ह्यावर बुलढाणा, अमरावती, वाशिम जिल्ह्याचा भार पाहता लहान मुलांसाठी विशेष कक्ष व त्यांच्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात यावी व कोविड  प्रादुर्भावामुळे शरीरातील अवयव डोळे, कान या भागावर याचा परिणाम होत आहे. यासाठीसुद्धा तज्ञ डॉक्टरांची टीम उभी करण्यात यावी.  त्यांचा उपचार मोठ्या प्रमाणावर व्हावा रोज पंचवीस ते तीस पेशंट यासंदर्भात सापडत आहे, ही चिंताजनक बाब आहे. याबाबत सुद्धा लक्ष केंद्रित करण्याची मागणी जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार सावरकर केली आहे.  याचासुद्धा नियोजन हे हॉस्पिटल सुरू करताना करावा, जेणेकरून गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना तसेच आदिवासी, दलित, मागासवर्गीय तसेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल,असे देखील सावरकर यांनी म्हंटले आहे.




सध्याच्या काळात आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मध्यप्रदेश सरकारने आयुष्यमान भारत योजना अंतर्गत खाजगी रुग्णालयात सुद्धा आरोग्याची सेवा उपलब्ध सुरू केली आहे. त्याच प्रमाणे रुग्णसेवा सुरू करता येते काय यासंदर्भात सुद्धा राज्य शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे.




हे हॉस्पिटल कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी. रिक्त जागा भरण्यात यावी. शंभर टक्के जागा भरून सर्व आजारांच्या रुग्णांना या रुग्णालयाचा लाभ व्हावा. पश्‍चिम विदर्भात सोबत मराठवाड्यातील सुद्धा रुग्णांनी याचा लाभ घेण्याकरिता केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी केंद्र सरकारकडून निधी आणून हॉस्पिटल सुरू केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचा हिस्सा देऊन हे हॉस्पिटल उभे केले आहे. रुग्णांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरावे, अशी अपेक्षा आमदार सावरकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्य शासनाने निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या