- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे रेस्क्यू फोर्सने एका तासात मृतदेह शोधुन बाहेर काढला
*नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील घटना
अकोला: जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन द्वारा संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या 'रेस्क्यू फोर्स' ला चार दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या इसमाचा एका तासात मृतदेह शोधुन बाहेर काढण्यास यश मिळाले.
घटनाक्रम
मृतकाच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार
25 मे रोजी हिंगोली येथील सुरेश रमेश काळे (वय अं. 37 वर्षे) हे आपली सासरवाडी कोळी ता.हदगाव जि.नांदेड येथे पत्नी व मुलासह कारने जात होते. घोडा कामठा पुलाजवळ थांबले असता, यावेळी उद्धव पैनगंगा प्रकल्प ईसापुर या कॅनॉल मध्ये वाहून गेले होते.
स्थानिक पातळीवर शोध घेतला असता कॅनाॅल मध्ये 15-20 फुट खोल पाणी आणी प्रचंड प्रवाहामुळे काहीच मिळुन आले नाही. यावेळी कळमनुरीचे तहसीलदार मयुर खेंगळे यांनी पिंजर (जिल्हा अकोला) येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे (जिवरक्षक) यांना याबाबत माहिती दिली.
लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी राहुल साटोटे, अंकुश सदाफळे, मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, ऋषीकेश तायडे, चेतन इंगळे, गोविंदा ढोके यांना सोबत घेवून शोध व बचाव साहित्यासह आज सकाळी घटनास्थळी 5:30 वाजता पोहोचले. यानंतर लगेच सर्च ऑपरेशन चालु केले. एका तासात घटनास्थळापासुन चार की.मी.अंतरावर बाळापुर आखाडा पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव जवळील पुलाजवळ पैनगंगा प्रकल्पाच्या कॅनाॅल सायपणातील प्रेशर जाळीत फसलेल्या मृतदेहाचा शोध लावला.
पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात मोठया धाडसाने कसोशीने प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढण्यासाठी थरारक अशी यशस्वी कामगिरी पथकातील सदस्यांनी केली. यावेळी बाळापुर आखाडा (जि.नांदेड) चे ठाणेदार प्रविण हुंडेकर, पो.हे.काॅ.मधुकर नांगरे व पंढरी चव्हाण तसेच पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आणी नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते विनायकराव भिसे पाटील, छत्रपती सेनेचे सागर माने हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा